शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण, सुटका

By admin | Updated: November 16, 2014 00:10 IST

शिराळ्यातील घटना : विद्यार्थ्यास स्वारगेट बसस्थानकावर सोडले

शिराळा : शाळेत सोडण्याच्या बहाण्याने आठवीत शिकणाऱ्या शाम चंद्रकांत दंडवते (वय १४) या विद्यार्थ्याचे मोटारीतून अपहरण करण्यात आल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी घडली होती. अपहरणकर्त्यांनी विद्यार्थ्यास पुणे येथे नेले. परंतु त्या ठिकाणी वाहनांची पोलीस तपासणी सुरू असल्याने त्यांनी विद्यार्थ्यास स्वारगेट बसस्थानकात सोडून पलायन केले. यामुळे सुदैवाने पुणे पोलिसांच्या मदतीने काल अपहरण झालेला शाम आज शनिवारी सुखरुप घरी पोहोचला.शिराळा येथील पाडळी रस्त्यावर राहणारा शाम दंडवते (मूळ गाव अंत्री खुर्द, ता. शिराळा) हा शेतमजूर कुटुंबातील आहे. शुक्रवार, दि. १४ रोजी सकाळी साडेदहा वाजता नेहमीप्रमाणे तो श्री सद्गुरू आश्रमशाळेत जाण्यासाठी निघाला होता. तो तडीचा कोपरा येथील चौकात आला असता, त्याच्याजवळ पांढऱ्या रंगाची चारचाकी येऊन थांबली. आत बसलेल्या तरुणाने त्यास तुला आम्ही गाडीने शाळेत सोडतो, असे सांगितले. शाम त्यांचे म्हणणे ऐकून गाडीत बसला. गाडीमध्ये पाच तरुणांसह आणखी एक लहान मुलगा होता. अंबामाता मंदिराजवळ आल्यावर शामने त्यांना माझी शाळा आली असून, गाडी थांबविण्यास सांगितले. परंतु गाडी न थांबता तशीच कोकरूड रस्त्यावरून पुण्याकडे निघाली. शाळेत न सोडल्याने शामने आरडाओरडा सुरू केला. परंतु गाडी टोलनाक्याव्यतिरिक्त कुठेही थांबविण्यात आली नाही.गाडी पुण्यात आल्यावर स्वारगेटजवळ पोलिसांकडून गाड्यांची तपासणी सुरू होती. हे पाहिल्यावर आपले अपहरणाचे बिंग फुटेल, या भीतीने अपहरणकर्त्यांनी शामला स्वारगेटजवळ गाडीतून उतरविले आणि ते निघून गेले. नवीन शहरात आल्यामुळे शाम भांबावून गेला होता. तेथील काही महाविद्यालयीन तरुणांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने त्यांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने घडलेली हकीकत त्यांना सांगितली. आज शनिवारी दुपारी शाम घरी आल्यावर आई आणि त्याच्या भावाने त्याला मिठी मारून हंबरडा फोडला. शाळेतील विद्यार्थ्यांनी शामला भेटण्यासाठी त्याच्या घरी गर्दी केली होती. या घटनेमुळे शिराळा शहरात विशेषत: पालकांच्यात घबराटीचे वातावरण आहे. पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांकडून मदत$$्रिपुणे येथील महाविद्यालयीन तरुणांनी त्यास स्वारगेट पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडेअकराच्यादरम्यान दूरध्वनीवरून शामच्या घरी फोन करून तो सुखरूप असल्याचे सांगितले. मध्यरात्री शामचे वडील तातडीने पुण्यास गेले. तेथे पोलिसांनी चौकशी करून त्यास वडिलांच्या स्वाधीन केले. आज शनिवारी दुपारी शाम घरी आल्यावर आई आणि त्याच्या भावाने त्याला मिठी मारून हंबरडा फोडला. शाळेतील विद्यार्थ्यांनी शामला भेटण्यासाठी त्याच्या घरी गर्दी केली होती.