मिरज : मिरजेतील राजीव मार्टीन देवासिया (वय ५४) रा. समतानगर चौगुले प्लॉट मिरज यांचे दुचाकीवरून अपहरण करून धारदार हत्यार व खेळण्यातील पिस्तूलचा धाक दाखवत मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. पाचजणांनी राजीव यांच्या मोबाइलमध्ये जबरदस्तीने ॲप इन्स्टॉल करून ९८ हजार रुपये ऑनलाइन लंपास केल्याची तक्रार आहे.मिरजेतील समतानगर येथील वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करणारे राजीव देवासिया यांना दोन दुचाकीवरून आलेल्या पाचजणांनी सांगली रस्त्यावरून राजीव यांच्या दुचाकीवरून जबरदस्तीने त्यांना बामणी येथे नदीजवळ नेले. (एमएच १० सीडी ०७५४) दुचाकीवरील रितेश कुरणे याने चाकूसारख्या धारदार हत्याराचा व बनावट पिस्तूलचा धाक दाखवून राजीव यांच्याकडील मोबाइल, आधारकार्ड व पॅनकार्ड लतीफ खाजा शेख याच्याकडे देण्यास भाग पाडले.यावेळी दुचाकी (एमएच १० एआर ९९२२) वरून आलेले व वाहिद मुल्ला, राजेश गुजराथी, राहील शेख यांनी राजीव यांना शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. लतीफ शेख याने राजीव यांच्या मोबाइलमध्ये ‘क्रेडिटबी’ ॲप जबरदस्तीने इन्स्टॉल करून त्यांच्या नावावर कर्ज मंजूर करून घेतले. गुगल-पे अकाऊंटवरून ९८ हजार रुपये लडमन जोएबशान इकबाल हुसेन यांच्या खात्यावर ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर राजीव यांना परत पाठवून दिले.याप्रकरणी राजीव मार्टिन यांनी गांधी चौक पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. आरोपी रितेश कुरणे, लतीफ खाजा शेख, वाहिद मुल्ला, राजेश गुजराथी व राहील शेख (सर्व रा. माणिकनगर, मिरज) या पाचजणांविरुद्ध अपहरण व फसवणुकीचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक करण्यात आली. रितेश कुरणे हा पसार आहे. अटक केलेल्या चौघांना न्यायालयाने दि. ७पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे पुढील तपास करीत आहेत.
Web Summary : Miraj resident kidnapped, robbed of ₹98,000 via forced app install using a toy gun. Four arrested, one at large; police investigate.
Web Summary : सांगली के मिरज में खिलौना पिस्तौल दिखाकर एक व्यक्ति का अपहरण, ऐप इंस्टॉल करवाकर ₹98,000 की लूट। चार गिरफ्तार, एक फरार; पुलिस जांच जारी।