शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

खानापूरमध्ये खिलार यात्रा

By admin | Updated: December 29, 2016 00:18 IST

चलन तुटवड्याचा फटका : नगरपंचायत व बाजार समितीचे संयोजन

खानापूर : मार्गशीर्ष अमावास्येपासून सुरू होणाऱ्या खानापूर येथील खिलार जनावरांच्या यात्रेस बुधवारी प्रारंभ झाला. यात्रेची सुरुवात दरवर्षानुसार शेळ्या-मेंढ्यांच्या बाजाराने झाली. शेळ्या-मेंढ्यांचा बाजार अजून दोन दिवस चालणार असून, शनिवारपासून खिलार जनावरांच्या बाजारास सुरुवात होणार आहे. बुधवारी शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात आवक चांगली झाली. मात्र चलन तुटवड्यामुळे दर पडले व व्यवहार जेमतेम झाले. मात्र पहिल्यादिवशी तीन ते चार लाख रुपयांचे व्यवहार झाले. शेळ्या-मेंढ्यांचा बाजार गुरुवारी व शुक्रवारी भरणार असल्याने पुढील दोन दिवसात चांगले व्यवहार होण्याची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. पहिल्यादिवशी शेळ्या-मेंढ्यांची आवक चांगली झाली. मात्र गेल्या महिन्यापासून नोटाबंदीमुळे सर्वत्र जाणवणाऱ्या आर्थिक मंदीचा फटका यात्रेमधील व्यवहारास बसला. बुधवारी सकाळी दर तेजीत होता, मात्र चलन तुटवड्यामुळे मागणी कमी झाली व दर पडले. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली. चलन तुटवड्यामुळे ‘शेतकरी टु शेतकरी’ व्यवहार फार कमी झाले. झालेले बहुतेक व्यवहार व्यापारी वर्गाकडून झाले. बाजारात एक वर्षाच्या बोकडास पाच ते सहा हजार रुपये दर मिळाला. शेळ्यांनाही पाच ते सहा हजारापर्यंत दर मिळाला, तर शेळी व दोन कोकरांना सात ते अकरा हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. दीड- दोन वर्षाच्या बोकडास सात ते आठ हजार रुपये दर मिळाला. बाजारात मेंढ्यांची आवक कमी होती. मेंढीचा दर सात ते आठ, तर एक वर्षाच्या मेंढ्याचा दर आठ ते अकरा हजारपर्यंत होता. बाजार जुन्या बसस्थानकालगतच्या खासबाग मैदानात भरला होता. संयोजन नगरपंचायत व कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे. (वार्ताहर)नवीन वर्षामधील : पहिली यात्राशनिवारपासून खिलार जनावरांच्या बाजारास सुरुवात होणार आहे. नवीन वर्षामधील पहिली यात्रा म्हणून ‘खानापूर यात्रा’ ओळखली जाते. शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात खानापूरबरोबरच आटपाडी, तासगाव तालुक्यामधून शेळ्या-मेंढ्यांची आवक झाली होती, तर खरेदीसाठी सांगली, कऱ्हाडबरोबर कोकणामधील व्यापारी वर्गाने हजेरी लावली होती.