Sangli: वाळव्यात नायकवडी काका - पुतण्या आमने सामने, केदार नायकवडी यांचा वैभव नायकवडींवर भ्रष्टाचाराचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 19:14 IST2026-03-11T19:14:19+5:302026-03-11T19:14:42+5:30

हुतात्मा कारखान्यात यादवी सुरू

Kedar Nayakwadi alleges that Chairman Vaibhav Nayakwadi of Hutatma Sugar Factory illegally sold sugar worth Rs 200 crores | Sangli: वाळव्यात नायकवडी काका - पुतण्या आमने सामने, केदार नायकवडी यांचा वैभव नायकवडींवर भ्रष्टाचाराचा आरोप 

Sangli: वाळव्यात नायकवडी काका - पुतण्या आमने सामने, केदार नायकवडी यांचा वैभव नायकवडींवर भ्रष्टाचाराचा आरोप 

वाळवा : हुतात्मा साखर कारखान्यात अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी सुमारे पावणे दोनशे कोटी रुपयांची साखर अनधिकृतपणे विकली असल्याचा आरोप केदार नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत केला. विशेष म्हणजे केदार हे वैभव नायकवडी यांचे पुतणे आहेत. त्यांनी म्हटले की, आमचे आरोप खोटे असतील तर वैभव नायकवडी यांनी स्वतः त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे किंवा सर्व सभासदांसमोर हुतात्मा चौकात एकाच व्यासपीठावर यावे. यामुळे हुतात्मा उद्योग समूहात काका-पुतण्या संघर्ष तापला आहे.

केदार नायकवडी यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करत हे आरोप केले. त्यानंतर कारखाना प्रशासनाने हे आरोप खोडसाळपणाचे असून स्वार्थासाठी केले असल्याचे म्हटले होते. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी केदार नायकवडी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि जोरदार टीका केली.

ते म्हणाले की, कारखान्यात कोट्यवधींची साखर अनधिकृतपणे विकली आहे. माझ्या तक्रारीनंतर प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी गेल्या दोन महिन्यांपासून याबाबत चौकशी सुरू केली आहे. मात्र, शासकीय यंत्रणेवर दबाव टाकला जात आहे. हुतात्मा साखर कारखान्यात वैभव नायकवडी यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे आणि आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही खोडसाळपणे किंवा स्वार्थासाठी बोलत असू तर वैभव नायकवडी यांनी त्यावर स्वतः बोलावे. अधिकाऱ्यांना सांगण्याऐवजी त्यांनी खुलासा करावा.

हुतात्मा साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला नसेल, तर वैभव नायकवडी यांनी कधीही आणि कुठेही एका व्यासपीठावर यावे किंवा हिम्मत असेल तर विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी. वैभव नायकवडी हे या प्रकरणात पूर्णपणे अडकले आहेत, त्यामुळे ते बचावासाठी धडपडत आहेत. मात्र, हुतात्मा साखर कारखाना अण्णांच्या आचार आणि विचारांच्या धोरणानेच चालला पाहिजे. गेल्या तीन वर्षांत आम्ही कारखान्यात लक्ष दिले असता, जवळपास १८ ते २० कोटी रुपयांचा नफा कारखान्याला झाला आहे. यापुढे वैभव नायकवडी यांची कारखान्यातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे जनतेसमोर आणणार आहोत.

वैभव नायकवडी यांनी 'ॲग्रो नित्यम' नावाची कंपनी स्थापन करून कारखाना कसा लुटला याचा पुराव्यानिशी पर्दाफाश करणार आहोत. - केदार नायकवडी

Web Title : सांगली: भतीजे ने चाचा पर चीनी मिल में भ्रष्टाचार का आरोप लगाया

Web Summary : केदार नायकवडी ने अपने चाचा वैभव नायकवडी पर चीनी मिल में 1.75 अरब रुपये के भ्रष्टाचार का आरोप लगाया। उन्होंने सार्वजनिक स्पष्टीकरण की मांग की, जिससे पारिवारिक और व्यावसायिक संघर्ष बढ़ गया। जांच जारी है।

Web Title : Sangli: Nephew Accuses Uncle of Corruption in Sugar Factory

Web Summary : Kedar Nayakwadi accuses his uncle, Vaibhav Nayakwadi, of ₹1.75 billion sugar factory corruption. He demands public clarification, escalating family and business conflict. Investigation ongoing.