सरपंचपद खुले असल्याने याच गटातून सरपंचपदासाठी योगेश पाटील व उपसरपंचपदासाठी अमोल माळी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी योगेश पाटील यांची सरपंचपदी व अमोल माळी यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर नेते सुभाष पाटील, प्रमोद इनामदार यांनी त्यांचा सत्कार केला. या निवडीने गावविकास कामाची जबाबदारी नेते सुभाष पाटील यांनी पाटील व माळी यांची निवड करून तरुण नेतृत्त्वावर सोपविली आहे.
चौकट
पाटील घराण्याची एन्ट्री
योगेश पाटील यांची सरपंचपदी निवड झाल्याने पाटील घराण्याची ग्रामपंचायतीच्या राजकारणात दहा वर्षांनंतर एन्ट्री झाली आहे. यापूर्वी दिवंगत आप्पासाहेब पाटील हे गावचे सरपंच, पंचायत समितीचे माजी उपसभापती होते. तद्नंतर त्याचे पुत्र सुभाष पाटील सरपंच होते. राजीनामा देऊन ते पंचायत समितीत निवडून आले. सभापतीपदही भूषविले. दहा वर्षांच्या कालखंडानंतर पाटील घराणे योगेश पाटील यांच्या माध्यमातून गावच्या राजकारणात सक्रिय झाले आहे.
फोटो -
फोटो-१०योगेश पाटील
१०अमोल माळी