शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

काका-पुतण्यातील सुसंवादाने कासेगावकरांना सुखद धक्का

By admin | Updated: September 1, 2015 22:31 IST

जयंतराव-देवराज दादांची चर्चा : विधानसभेनंतर प्रथमच एकत्र

प्रताप बडेकर- कासेगाव माजी ग्रामविकास मंत्री, आमदार जयंत पाटील व त्यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून मतभेद असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. विधानसभेवेळी मानसिंगराव नाईक यांना कासेगावातून कमी मतदान मिळाल्यामुळे जयंतराव पुतण्यावर नाराज असल्याचीही चर्चा होती, परंतु येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात काका-पुतण्याने व्यासपीठावर हसत हसत अनेक विषयांवर सुसंवाद साधला. हे पाहून उपस्थितांना सुखद धक्का बसला.कासेगाव (ता. वाळवा) हे जयंत पाटील यांचे गाव असल्याने जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या गावाला विशेष महत्त्व आहे. जयंतरावांमुळेच सरपंच पदापासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदापर्यंत देवराज पाटील यांना झेप घेता आली. देवराज पाटील यांनीही या संधीचे सोने करत समतोल विकास साधण्याचा प्रयत्न केला. नम्र, संयमी स्वभावाने विरोधकांशीही चांगले संबंध निर्माण केले. परंतु लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कासेगावातून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अपेक्षित मतदान मिळाले नाही. विधानसभा निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांच्या विरोधात असलेल्या शिवाजीराव नाईक यांना मताधिक्य मिळाले. यामुळे जयंतरावांना धक्का बसला. त्यातूनच ते देवराज पाटील यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यांच्यात मतभेद झाल्याचेही बोलले जात होते. जयंतरावांनी विविध कार्यक्रमातून नाराजी बोलून दाखवली होती. आपल्या गावानेच घात केल्याचे देवराज पाटील, लिंबाजी पाटील व रवींद्र बर्डे यांच्याकडे कटाक्ष टाकून ते बोलले होते. तथापि येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात दोघे काका-पुतणे व्यासपीठावर हसतहसत विविध विषयांवर चर्चा करताना दिसले. या दोघांमध्ये पूर्वीप्रमाणेच संबंध निर्माण झाल्याचे पाहून उपस्थित कासेगावकरांसह देवराज पाटील समर्थकांना सुखद धक्काच बसला.सबकुछ देवराज पाटीलज्येष्ठ नेते जनार्दनकाका पाटील यांच्या आजारपणामुळे व वाढत्या वयाने सार्वजनिक व राजकीय व्यासपीठावरील त्यांचा वावर कमी होऊ लागला आहे. त्यामुळे या परिसरातील कोणताही निर्णय घेताना त्यांचे पुत्र देवराज पाटील यांच्यावरच जयंतराव विश्वास टाकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे देवराज पाटील यांची जबाबदारी वाढली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष असतांनाही देवराज पाटील यांनी चांगला कारभार करून राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांचे लक्षवेधून घेतले होते. सध्या ते अध्यक्ष नसले तरीही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमधील संवाद बिघडू नये याकडे त्यांचे लक्ष असते.