Join the photo of Raut, Awhad on behalf of Bhajyumo | भाजयुमोच्यावतीने राऊत, आव्हाड यांच्या फोटोस जोडे मारो आंदोलन
भाजयुमोच्यावतीने राऊत, आव्हाड यांच्या फोटोस जोडे मारो आंदोलन

ठळक मुद्दे भाजयुमोच्यावतीने राऊत, आव्हाड यांच्या फोटोस जोडे मारो आंदोलन फोटोचे दहन, राम मंदिर चौक येथे घोषणा

सांगली : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या शिवसेनेच्या संजय राऊत व राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज भाजपा युवा मोर्चाच्यावतीने राम मंदिर चौक, सांगली येथे सकाळी १२ वाजता आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोस जोडे मारून त्याचे  दहन केले व त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केली.

यावेळी भाजपा आमदार सुधीर  गाडगीळ, सांगली शहर जिल्हाध्यक्ष दीपक  शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे दीपक माने, विशाल मोरे, केदार खाडिलकर, पृथ्वीराज (नाना) पाटील, अमित भोसले, धनेश कातगडे, राहुल माने, राजू जाधव, विश्वजीत पाटील, चेतन माडगुळकर, प्रथमेश वैद्य, प्रवीण कुलकर्णी, अजित ढोले, शांतीनाथ कर्वे, रमेश शिंदे, स्वप्नील माने, हेमंत कुलकर्णी, अनिकेत बेळगावे, आबासाहेब जाधव, राजू मद्रासी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 

Web Title:  Join the photo of Raut, Awhad on behalf of Bhajyumo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.