शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

जिरवाजिरवीत गुंठेवारीचा बळी

By admin | Updated: February 13, 2015 22:55 IST

विकास आराखडा : पोस्टमार्टमची गरज

शीतल पाटील- सांगली -महापालिकेचा विकास आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर आता नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे. विशेषत: गुंठेवारी क्षेत्रातील आरक्षणांचा बाजार होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. तत्कालीन काँग्रेस व नंतर सत्तेत आलेल्या विकास महाआघाडीच्या जिरवाजिरवीच्या राजकारणात गुंठेवारी भागातील आरक्षणे कायम राहिली आहेत. त्यामुळे शिस्तबद्ध विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या मानगुटीवर कारवाईची टांगती तलवार ४० वर्षांनंतरही कायम राहणार आहे.
महापालिकेची स्थापना झाल्यानंतर तब्बल १६ वर्षांनी विकास आराखड्याला मूर्त स्वरुप आले. आराखडा प्रसिद्ध होताच आरक्षणाची माहिती घेण्यासाठी नागरिकांची रिघ पालिकेत लागली आहे. या आराखड्यात गुंठेवारी भागात २७७ आरक्षणे टाकली आहेत. त्यात डीपी रस्ते, प्राथमिक शाळा, क्रीडांगणे, पार्किंग, उद्याने यांचा समावेश आहे. शहराचा विस्तार वाढत असताना नागरिकांसाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असते, हे मान्य केलेच पाहिजे. कुपवाडचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास, या शहरात एकही उद्यान नाही. आजपर्यंत त्यासाठी प्रयत्नही झाले नाहीत. पण वातानुकूलित कार्यालयात बसून आराखडा तयार करणेही चुकीचेच म्हणावे लागेल.
२००३-०४ मध्ये विकास आराखडा तयार करताना खासगी कंपनीने सॅटेलाईटचा सर्वाधिक वापर केला. त्यातून १९७४ च्या आराखड्यातील काही आरक्षणे कायम ठेवली. वस्तुत: या आरक्षणांची स्थळपाहणीच झाली नाही. त्रिमूर्ती कॉलनीजवळ आराखड्यात एक ८० फुटी रस्ता निर्देशित केला आहे. या रस्त्याचे आरक्षण १९९२ मध्येच राज्य शासनाने विशेष बाब म्हणून उठविले होते. तरीही आताच्या आराखड्यात पुन्हा हे आरक्षण कायम ठेवले आहे. ९२ नंतर या जागेवर टोलेजंग इमारती झाल्या आहेत. अशीच स्थिती ख्वाजा कॉलनीतील भूखंडाची आहे. तिथे पार्किंगचे आरक्षण आहे, पण या भूखंडावर नागरी वस्ती झाली आहे. अशी कित्येक उदाहरणे देता येतील.
तत्कालीन काँग्रेसने आरक्षण वगळण्याचे सर्वाधिकार तत्कालीन महापौर किशोर जामदार यांना दिले होते. त्यांनी ऐनवेळचे ठराव करीत १७४ आरक्षणे वगळण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय योग्य होता, असे म्हणता येणार नाही. या ठरावातील काही आरक्षणे नागरी वस्तीवर होती. ती उठविणे क्रमप्राप्त होते. काही निर्णय स्वकियांचे हित जपण्यासाठी घेतले होते. त्यावरून बरेच वादळ उठले. भूखंडाचे श्रीखंड खाल्ल्याचा आरोप झाला. त्यातून सांगलीच्या नागरिकांनी विकास महाआघाडीला सत्तेवर आणले.
महाआघाडीने ही आरक्षणे कायम ठेवण्याचा ठराव केला. पण तो करताना या आरक्षणांचे पोस्टमार्टम केले नाही. नागरी हिताची आरक्षणे वगळण्याबाबत जागेवर जाऊन पाहणी करून निर्णय घेतले नाहीत. सरसकट ठरावच रद्द केला. त्यामुळे, सुक्याबरोबर ओलेही जळते, याप्रमाणे काँग्रेसच्या स्वकियांसोबतच गुंठेवारी भागातील नागरिकांचा नाहक बळी गेला. आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर ही बाब प्रकर्षाने पुढे येत आहे. गुंठेवारीत आरक्षित जागेवर नागरी वस्ती असेल, तर ते आरक्षण वगळून इतरत्र त्याची व्यवस्था करता आली असती. पण जिरवाजिरवीच्या राजकारणात या गोष्टीचे भान ना सत्ताधाऱ्यांना राहिले, ना विरोधक असलेल्या काँग्रेसला! आता मात्र नागरिक महापालिकेच्या नावाने शंख करीत आहेत. पण त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.

गुंठेवारी कायद्याचा आधार
गुंठेवारी कायद्यातील कलम ५ मध्ये विकास आराखडा, अर्बन सिलिंग अ‍ॅक्ट, कूळ कायदा, महसूल या कायद्यात काहीही म्हटले असले तरी, गुंठेवारी नियमितीकरण झाल्यास आरक्षणाचा उद्देश संपेल. या कायद्याच्याआधारे काही आरक्षणे वगळता येतात. विकास योजनेतील जागा स्थानिक स्वराज्य संस्थेला आवश्यक वाटत नसेल, तर गुंठेवारी नियमितीकरण करता येते. या आधारावर अनेक ठिकाणी गुंठेवारी नियमितीकरण झाले आहे. अशा ठिकाणीही सध्या आरक्षणे पडली आहेत. त्यामुळे सर्वसाधारणपणे नऊ हजार नागरिक आरक्षणाने बाधित होत आहेत. सत्ताधाऱ्यांनी वेळीच ही आरक्षणे वगळली असती, तर आता जनतेला त्रास सहन करावा लागला नसता. आता या नागरिकांना न्यायालयाचे दरवाजे ठोठाविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.