शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांपुढे रघुनाथदादांचा फुसका बार!

By admin | Updated: May 22, 2015 00:08 IST

शेतकरी संघटनेचे चौघेच रिंगणात : राजारामबापू कारखाना निवडणुकीचा फार्स; लाखो रुपयांचा चुराडा

अशोक पाटील - इस्लामपूर -माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या राजारामबापू साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जयंत पाटील गटाचे १३ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत, तर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी चार उमेदवार उभे करून तोकडे आव्हान दिले आहे. निवडणूक प्रक्रिया म्हणून हा केवळ फार्स ठरणार असल्याने, प्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा चुराडा होणार आहे.सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात राजारामबापू कारखाना हा सक्षम कारखाना म्हणून मानला जातो. या कारखान्याची एक शाखा असून दोन कारखाने चालविण्यास घेतले आहेत. प्रत्येक हंगामात ऊस उत्पादकाला चांगला दर देण्याची कारखान्याची ख्याती आहे. या कारखान्याच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुका नेहमीच बिनविरोध होत आल्या आहेत. मात्र गत निवडणुकीपासून शेतकरी संघटना एक-दोन जागांसाठी निवडणूक लावत आहे. यावेळीही शेतकरी संघटनेने चार उमेदवार उभे करून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे.नेहमीप्रमाणेच या निवडणुकीतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व रघुनाथदादा पाटील यांचे शिष्य खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेला उमेदवार मिळाले नाहीत. तरीसुध्दा रघुनाथ पाटील यांच्या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्ची पडणार आहेत.यावेळी ऊस उत्पादकाला जयंत पाटील यांनी एफआरपीपेक्षा कमी दर दिला आहे. याविरोधात शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आवाज उठवला नाही, याचीही खंत ऊस उत्पादकांत आहे. राजारामबापू कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ऊस उत्पादकांनी जो कारखाना जास्त दर देईल, त्याच कारखान्याला ऊस घालण्याचे धोरण अवलंबले आहे. या कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांची ताकद तोकडी तर पडली आहेच, त्यातच विरोधकांच्या पाठीशी ऊस उत्पादकही नसल्याचे चित्र आहे. जयंत पाटील नुकतेच जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत यशस्वी झाले आहेत. त्यामुळे त्यांची जिल्ह्यावरील पकड मजबूत होऊ लागली आहे. येणाऱ्या सहकारी संस्थांच्या सर्वच निवडणुका ते सहजरित्या पार पाडतील. त्यामुळे या कारखाना निवडणुकीतील रघुनाथदादांचे आव्हान अत्यंत तोकडे ठरणार आहे.‘स्वाभिमानी’ तर रिंंगणातच नाही...राजारामबापू साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुका नेहमी बिनविरोध होत आल्या आहेत. मात्र मागील निवडणुकीपासून शेतकरी संघटना एक-दोन जागांसाठी निवडणूक लावत आहे, तर दुसऱ्या बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेला उमेदवार मिळाले नाहीत. तरीसुध्दा रघुनाथ पाटील यांच्या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्ची पडणार आहेत.