जयंत पाटील यांची पुतण्याच्या लग्नात गायकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 16:16 IST2021-01-06T16:14:33+5:302021-01-06T16:16:54+5:30

jayant patil singer sangli kolhapur- जलसंपदामंत्री जयंत पाटील हे संगीतप्रेमी असल्याची गोष्ट सर्वपरिचीत असली तरी त्यांच्या गायकीची कल्पना कोणाला नव्हती. कोल्हापूर येथे पुतण्याच्या लग्नसोहळ्यापूर्वी रंगलेल्या हळदीच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी किशोर कुमार यांचे एक गाणे गाऊन याची झलक दिली.

Jayant Patil singing at his nephew's wedding | जयंत पाटील यांची पुतण्याच्या लग्नात गायकी

जयंत पाटील यांची पुतण्याच्या लग्नात गायकी

ठळक मुद्देजयंत पाटील यांची पुतण्याच्या लग्नात गायकी आप्तेष्टांसह कार्यकर्त्यांकडून दाद,व्हिडिओ होतोय व्हायरल

सांगली : जलसंपदामंत्री जयंत पाटील हे संगीतप्रेमी असल्याची गोष्ट सर्वपरिचीत असली तरी त्यांच्या गायकीची कल्पना कोणाला नव्हती. कोल्हापूर येथे पुतण्याच्या लग्नसोहळ्यापूर्वी रंगलेल्या हळदीच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी किशोर कुमार यांचे एक गाणे गाऊन याची झलक दिली.

'बुढ्ढा मिल गया' या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले 'रात कली एक ख्वॉब में आई' हे गाणे त्यांनी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये 'संगीत संध्या' कार्यक्रम आयोजित केला होता.

मैफील रंगल्यानंतर आप्तेष्टांनी जयंतरावांना एखादे आवडीचे गाणे सादर करण्यास सांगितले. त्यावेळी अंतरा व कडवे आठवत असलेले किशोर कुमार यांचे गीत त्यांनी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यांचा हा व्हिडिओ आप्तेष्टांसह समर्थक, कार्यकर्त्यांनी व्हायरल केला. त्याला अनेकांनी दाद दिली.

Web Title: Jayant Patil singing at his nephew's wedding