जयंत पाटील पालकमंत्री असताना जहागीरदारासारखे वागले, गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र
By अविनाश कोळी | Updated: September 28, 2022 17:27 IST2022-09-28T16:02:56+5:302022-09-28T17:27:34+5:30
मागील सरकारने दाखल केलेले असे सर्व खोटे गुन्हे चौकशी करुन रद्द करावेत, अशी शासनाकडे मागणी करणार

जयंत पाटील पालकमंत्री असताना जहागीरदारासारखे वागले, गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र
सांगली : पालकमंत्री असताना सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या बापाची जहागीरदारी असल्याप्रमाणे जयंत पाटील वागले. सत्तेचा इतका उन्माद चांगला नसतो, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
पडळकर म्हणाले, जयंत पाटील यांनी सत्तेचा गैरवापर केला. माझ्या भावावर हद्दपारीची नोटीस काढणारे जयंत पाटील हेच आता सत्तेतून हद्दपार झाले आहेत. मागील सरकारने दाखल केलेले असे सर्व खोटे गुन्हे चौकशी करुन रद्द करावेत, अशी शासनाकडे मागणी करणार आहोत.
आरेवाडी येथे दसरा मेळाव्याचे आयोजन
सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे दोन ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशसहित अनेक राज्यातील धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. धनगर समाजाच्या विविध प्रश्न, अडचणीवर मेळाव्यात होणार चर्चा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.