जांभळेवाडीत काठी, कुऱ्हाडीने चौघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:41+5:302021-02-05T07:25:41+5:30

शिराळा : जांभळेवाडी (ता. शिराळा) येथे सांडपाणी अडवल्याच्या कारणावरून काठी, कुऱ्हाडीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने चारजण जखमी झाले आहेत. ...

In Jambhalewadi, four people were beaten with sticks and axes | जांभळेवाडीत काठी, कुऱ्हाडीने चौघांना मारहाण

जांभळेवाडीत काठी, कुऱ्हाडीने चौघांना मारहाण

शिराळा

: जांभळेवाडी (ता. शिराळा) येथे सांडपाणी अडवल्याच्या कारणावरून काठी, कुऱ्हाडीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने चारजण जखमी झाले आहेत. याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये कुऱ्हाडीचा वार राजेश्री पवार यांच्या हाताला लागला आहे.

या घटनेची फिर्याद राजेश्री पवार यांनी दिली आहे. रविवार दि. ३१ रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान जनावरांच्या गोठ्यातील सांडपाणी अडवल्यावरून वाद झाला. तंटामुक्ती समितीचे भीमराव साळुंखे व उत्तम कडवेकर भांडण मिटविण्यासाठी आले होते. त्यांचे न ऐकता यावेळी संशयित भीमराव पवार, विद्या पवार, अक्षय पवार, हौसाबाई पवार यांनी राजेश्री पवार, पती मधुकर पवार, मुलगी वैशाली पवार, जाऊ वनिता पवार यांना काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. यावेळी कुऱ्हाडीने वार करताना राजेश्री पवार यांच्या डाव्या हातास जखम झाली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास हवालदार आनंदराव मटकरी करीत आहेत.

Web Title: In Jambhalewadi, four people were beaten with sticks and axes