शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

वाळव्यातून सांगलीत येण्यास उशीर झाला!

By admin | Updated: May 21, 2015 00:10 IST

दिलीपतात्या पाटील : ही खंत नव्हे, माझ्या राजकीय प्रवासाचे वर्णन..

सांगली : राजारामबापू उद्योग समूहातील अनेक संस्था, उपसा सिंचन प्रकल्प अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविण्यात मला यश मिळाले. यासाठी मला बराच कालावधी मिळाला. त्यामुळे वाळवा तालुक्यातून सांगलीपर्यंत येण्यास मला उशीर झाला, अशी भावना जिल्हा बँकेचे नूतन अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, ही खंत नव्हे, माझ्या राजकीय प्रवासाचे वर्णन आहे, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. ते म्हणाले की, राज्यातील सर्वात आदर्श संस्था म्हणून आमच्या अनेक संस्थांचा गौरव झालेला आहे. या संस्थांची जबाबदारी माझ्यावर सोपविली, तेव्हा अनेक अडचणी होत्या. वस्त्रोद्योग अडचणीत असताना मला सूतगिरणीची जबाबदारी दिली. अथक् प्रयत्नानंतर एक आदर्श सूतगिरणी उभारण्यात यश आले. संस्था, प्रकल्प आणि योजना राबविताना काम करण्यासाठी बराच कालावधी मिळाला. त्यामुळेच सांगलीपर्यंत येण्यास थोडा उशीर झाला. ही खंत आहे का?, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर ते म्हणाले की, ही खंत नाही, माझ्या राजकीय प्रवासाची माहिती आहे. कोणतीही वाढ नैसर्गिक असावी, असे माझे मत आहे. अशीच नैसर्गिक वाढ झाल्यामुळे आता जिल्हा बँकेपर्यंत मी पोहोचलो आहे. राजकारणात अनेकांना लगेच संधी मिळत असली तरी, वेगवेगळ्या मातीचा तो गुणधर्म आहे. काही ठिकाणी शेती लगेच पिकते, काही ठिकाणी पीक यायला उशीर होतो.बँकेतील वादग्रस्त गैरव्यवहार प्रकरणांविषयी ते म्हणाले की, या गोष्टी आता न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे त्यावर मी कोणतेही भाष्य करणार नाही. तरीही यापुढील काळात चांगला कारभार निश्चितपणे दिसून येईल. पारदर्शी कारभारावर लक्ष केंद्रित केले जाईल. प्रशासकांनी गेल्या तीन वर्षात जो कारभार केला, तो अत्यंत चांगला आहे. त्यांनी सुरू केलेल्या सर्व चांगल्या योजना, गोष्टी आम्ही पुढे चालू ठेवू. जिल्हा बँकेतील कारभाराचा मला अनुभव नाही. त्याविषयीचा अभ्यासही अद्याप केलेला नाही. अभ्यास करून बँकेचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने करू. पुणे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँका जशा नावाजलेल्या आहेत, तसाच नावलौकिक किंवा त्याहून अधिक चांगला कारभार करणार आहोत. (प्रतिनिधी)नोकरभरती पारदर्शीचलवकरच जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरभरती होणार आहे. ही भरती कशी होईल, याविषयी शंका उपस्थित होत असल्या तरी, आम्ही पारदर्शीपणाने ही भरती करणार आहोत. कोणतीही शंका उपस्थित होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.