इस्लामपूर : अरविंद पवारला कुरळप पोलिसांचे होते अभय! तडजोडीद्वारे गुन्हेगारी वाढली :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:09 AM2018-09-28T00:09:29+5:302018-09-28T00:11:29+5:30

कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाताई आश्रमशाळेतील आठ मुलींवरील लैंगिक शोषणाच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला असतानाच, येथील पोलिसांनी वेळोवेळी त्याच्या कृष्णकृत्यांबाबत केलेल्या सोयीस्कर दुर्लक्षाच्या कहाण्याही चर्चेत आल्या आहेत.

Islampur: Arvind Pawar was in Kurup police station! Criminal increase by compromise: | इस्लामपूर : अरविंद पवारला कुरळप पोलिसांचे होते अभय! तडजोडीद्वारे गुन्हेगारी वाढली :

इस्लामपूर : अरविंद पवारला कुरळप पोलिसांचे होते अभय! तडजोडीद्वारे गुन्हेगारी वाढली :

Next
ठळक मुद्देदडपलेल्या प्रकरणांच्या चौकशीची गरजआश्रमशाळेतील दुष्कृत्ये करताना त्याला कोणाचेही भय वाटले नाही

अशोक पाटील ।
इस्लामपूर : कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाताई आश्रमशाळेतील आठ मुलींवरील लैंगिक शोषणाच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला असतानाच, येथील पोलिसांनी वेळोवेळी त्याच्या कृष्णकृत्यांबाबत केलेल्या सोयीस्कर दुर्लक्षाच्या कहाण्याही चर्चेत आल्या आहेत. पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या असत्या, तर शाळेतील कित्येक मुलींवरील अत्याचाराच्या घटना टळल्या असत्या.

कुरळप पोलीस ठाणे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून १० ते १२ किलोमीटर आतील बाजूस आहे. त्यामुळे या ठाण्याशी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संपर्कही कमीच आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया गावांमध्ये घडलेल्या गुन्ह्यांवर तडजोडी करून पांघरुण घातले जाते. त्यामुळे याठिकाणी अवैध धंद्यांचाही सुळसुळाट झाला आहे. अरविंद पवार यानेही यापूर्वी अशीच काळी कृत्ये केली होती. परंतु त्यावरही पोलिसांनी पांघरुण घातले आहे. या प्रकरणात जे जे जबाबदार आहेत, त्यांची कसून चौकशी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

यापूर्वी अरविंद पवार याने पैशाच्या जोरावर अनेक बेकायदेशीर कामे केली आहेत. संस्थेवरील नियुक्त्यांपासून त्याने बेकायदेशीर कामांना सुरुवात केली. त्याने आपला भाचा सुभाष पाटील याची आश्रमशाळेवर अधीक्षक म्हणून नेमणूक केली, तर पत्नी नंदा पवार हिचेही नाव स्वयंपाकीण म्हणून आश्रमशाळेच्या मस्टरवर घेतले आहे. तिच्याबदली मनीषा कांबळे हिला स्वयंपाकाच्या कामासाठी नेमले होते. तिच्या माध्यमातूनच तो या मुलींवर अत्याचार करीत असल्याचे उजेडात आले आहे. संस्थेतील हा प्रकार पचविल्यानंतर एकामागोमाग एक काळी कृत्ये त्याने पूर्णत्वास नेली.

गणपती विसर्जनावेळी शाळेतील एका विद्यार्थ्याचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाला होता. हे प्रकरण त्याने दडपले. एका विद्यार्थ्याने पवार याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. शाळेतील बहुतांशी कर्मचाºयांना मांगले येथील त्याच्या शेतात आणि घरात काम करण्यास पवार भाग पाडत होता.
शाळेतील शिपाई संदीप सुरेश शिंदे यांना त्याने त्याच्या शेतातील झाड तोडण्यास सांगितले होते. परंतु झाड तोडताना शिंदे हे झाडावरून पडले आणि त्यांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरणही त्याने पचवले होते.

तडजोडीची झलक...
तडजोडीची झलक आश्रमशाळेतील घटनेनंतरही बुधवारी पोलिसांनी अनुभवली. त्याला ताब्यात घेऊन कुरळपला परतत असताना, ‘काय प्रकरण आहे ते आपसात मिटवूया’ असे म्हणत त्याने पोलिसांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला. यावरून त्याच्या तडजोडीतील सराईतपणाची कल्पना आली. यापूर्वी त्याचा हा ‘फॉर्म्युला’ कायम कामी आल्यामुळे आश्रमशाळेतील दुष्कृत्ये करताना त्याला कोणाचेही भय वाटले नाही.

वरिष्ठ अधिकाºयांकडून जनतेच्या अपेक्षा
कुरळप पोलिसांच्या या प्रकरणे दडपण्याच्या प्रकारामुळेच अरविंद पवारसारखे मुजोर या भागात वाढत आहेत. वरिष्ठ अधिकाºयांनी कुरळप पोलीस ठाण्याचे स्टिंग आॅपरेशन करून येथील कारभार सुधारावा, अशी माफक अपेक्षा येथील जनतेतून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Islampur: Arvind Pawar was in Kurup police station! Criminal increase by compromise:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.