शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर पालिकेतील सत्ताधारी खोटेच बोलतात

By admin | Updated: July 28, 2015 00:30 IST

विजय कुंभार : कारभाऱ्यांची हुकूमशाही, शहरातील विकासकामांची वाईट स्थिती

अशोक पाटील - इस्लामपूर पालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी आणि त्यांचे शासकीय नियुक्त सत्तावीसावे मुख्याधिकारी नीलेश देशमुख म्हणजे ‘हायफाय’ योजनेचे पुरस्कर्ते आहेत. चार वर्षात विकास कामांची वाईट अवस्था झाली आहे. राष्ट्रवादीतील मतभेदाचा फायदा घेऊन हेच हायटेक मुख्याधिकारी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांना चुकीचा सल्ला देतात. त्यामुळेच सत्ताधारी खोटे बोलतात, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.कुंभार म्हणाले, रस्ते, गटारी, वाहतूक, आरोग्य, नागरी सुविधांपासून शहर शेकडो मैल दूर आहे. गेल्या साडेचार वर्षात सत्ताधाऱ्यांचा कारभार पाहता, मुख्याधिकारी देशमुख यांनी बेकायदेशीर कामे कायदेशीर केली आहेत. विकासकामांवरील खर्चापेक्षा प्रशासकीय खर्च प्रचंड वाढवला आहे. मंजुर आकृतीबंधापेक्षा अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा भरणा केला आहे. प्रशासकीय बदल्यांच्या नावाखाली बेकायदेशीर अंतर्गत बदल्या केल्या आहेत. पालिकेचा अर्थसंकल्प वास्तववादी न करता रकमांची तोंडमिळवणी केली आहे. शासकीय लेखापरीक्षणातील आक्षेप याच मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यकाळात वाढले आहेत. त्यातील काही दोष वरिष्ठ अधिकाऱ्यांना खूष करून दुरुस्त करुन घेतले आहेत. शासनाच्या विविध विकास कामांसाठी आलेला निधी विकास कामांवर खर्च करण्यापेक्षा हायफाय जाहिराती व सर्व्हे करणाऱ्या एजन्सीवर खर्च करुन नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे. २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेसाठी आलेला निधी संपूर्ण सर्व्हे एजन्सीवर खर्च केल्याचे दिसते. शहरातील वायफाय सेवा सुरू होण्यापूर्वीच त्याचा गाजावाजा सुरू आहे. वास्तविक पाहता, ही सेवा बी.एस.एन.एल. कडून घेणे गरजेचे असताना, नगरपालिकेने खासगी कंपनीची सेवा कार्यरत करण्याचा घाट घातला आहे, असे ते म्हणाले. दलित वस्तीअंतर्गत मिळणारा निधी सहायक संचालक नगररचना सांगली आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाची मंजुरी घेऊन इतर विकास कामांसाठी बेकायदेशीररित्या वापरला जातो, असा आरोपही कुंभार यांनी केला.खासगी पुरस्कार...पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी पाणी पुरवठा पुरस्काराबाबत विरोधकांना चिमटे काढले, यावरून त्यांचे अज्ञान दिसून येते. हा पुरस्कार शासनाचा असल्याचे सांगून दिशाभूल केली आहे. खासगी नोंदणीकृत फौंडेशनचा हा पुरस्कार आहे. असे पुरस्कार राज्यातील बाजारात विकत मिळतात, असा आरोपही कुंभार यांनी केला आहे.मुख्याधिकारी देशमुख यांना आघाडी शासनाने सहा महिने मुदतवाढ दिली आहे. त्यांचा ३ वर्षांचा कार्यकाल केव्हाच पूर्ण झाला आहे. नगरविकासच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी मुक्काम वाढविला आहे. याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली असून, त्यांची बदली निश्चित आहे. बदली न झाल्यास आपण राजकारण सोडू.- विक्रम पाटील, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चाभारतीय दूरसंचार निगमच्या विविध योजना यशस्वीपणे कार्यान्वित आहेत. ब्रॉडबँड व वाय-फाय सेवा विनातक्रार व माफक दरात उपलब्ध आहेत. मात्र इस्लामपूर पालिकेने वाय-फाय योजनेसाठी आमच्याकडे कोणताही प्रस्ताव दिला नाही. प्रस्ताव दिला असता, तर मंजुरीसाठी तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असता.- प्रकाश पाटील, मंडल अधिकारी, बी.एस.एन.एल., इस्लामपूर