सांगली : महापालिकेचे प्रभारी अग्निशमन अधिकारी सुनील माळी (वय ४१, रा. कलानगर, सांगली ) यांच्यावर दीड महिन्यांपूर्वी झालेला खुनी हल्ला सुपारी देऊन केल्याचे पोलिस तपासांत निष्पन्न झाले आहे. संशयित मलिक सलीम शेख (रा. राजावत कॉलनी, दत्तनगर, बामणोली, ता. मिरज) आणि अभिजीत अनिलकुमार चव्हाण (रा. कमला निवास, राममंदिर चौक सांगली) या दोघांना अटक केली आहे. चव्हाण याच्या फर्मला काळ्या यादीत टाकल्याने त्याने माळी यांना जीवे मारण्याची सुपारी मुख्य संशयित मलिक शेख याला दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित अभिजीत चव्हाण यांचे रसिका मार्केटिंग आणि जीएलसी ग्रुप ऑफ फायर ॲन्ड सेफ्टी इंजिनिअर्स नावाच्या दोन फर्म आहेत. फर्मच्या परवाना मुदतीमध्ये खाडाखोड केल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. त्यामुळे अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी या दोन्ही फर्मला काळ्या यादीत टाकले होते. त्याचा अभिजीत चव्हाण यास राग होता. त्यामुळे त्याने गुन्ह्यातील मुख्य आरोपी मलिक शेख यास अधिकारी सुनील माळी यांना जीवे मारण्याची सुपारी दिली होती. त्यानुसार संशयित प्रथमेश सुरेश पाटोळे (२३, रा. झील शाळेच्या पाठीमागे, दत्तनगर, बामणोली), तोहिद ऊर्फ हुसेन फारुख सुतार (१९, रा. हांडे गल्ली, दत्तनगर, बामणोली, कुपवाड), डी. माया ऊर्फ शुभम आनंदा पारचे (रा. चाणक्य चौक, सांगली) यांच्यासह मलिक शेख अशा चौघांनी माळी यांच्यावर पाळत ठेवली होती. माळी कधी बाहेर पडतात कधी घरी परत येतात याची माहिती चौघांनी काढली होती.दि. २७ जानेवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास फिर्यादी शंकर बाजीराव जगदाळे (रा. दत्तमंदिरनजीक, पद्माळे, ता. मिरज) हे अधिकारी माळी यांना घेऊन दुचाकीवरून कलानगर येथील माळी यांच्या घरासमोर आले होते तेव्हा हल्लेखोर तेथेच दबा धरून बसले होते. माळी दुचाकीवरून खाली उतरताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार चाकूने बरगडीत वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, माळी यांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. छातीवर वार झाल्याने माळी खाली कोसळले.गंभीर जखमी झालेल्या माळी यांना नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून प्रथमेश पाटोळे आणि तोहिद सुतार या दोघांना अटक केली होती. दोघांची कसून चौकशी करण्यात आली होती तसेच इतर पुरावे गोळा करण्यात आले. तपासात सुपारी देऊन खुनी हल्ला केल्याचे स्पष्ट झाले.शहर पोलिस निरिक्षक अरुण सुगावकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक सागर होळकर यांना पसार झालेल्या दोघा संशयितांना अटक करण्याचे निर्देश दिले होते. पथकातील संदिप पाटील, गौतम कांबळे, संतोष गळवे यांना मुख्य आरोपी मलिक शेख हा विष्णुअण्णा फळ मार्केट येथे येणार असल्याची माहिती मिळाली. परिसरात सापळा रचून पोलिसांनी शेख यास अटक केली. चौकशी केल्यानंतर त्याने अभिजीत चव्हाण याने माळी यांच्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी चव्हाण याला देखील अटक केली.
संशयितांकडून दिशाभूलमाळी यांच्यावर हल्ला केल्यानंतर दोघा संशयितांना सीसीटीव्ही फुटेजवरून ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी करताना त्यांनी वेगवेगळी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी खरे कारण शोधून काढले.
Web Summary : Sangli fire officer Sunil Mali's attack was a contract killing. Abhijit Chavan, blacklisted by Mali, hired Malik Sheikh. Police arrested both after finding evidence connecting them to the crime.
Web Summary : सांगली में अग्निशमन अधिकारी सुनील माली पर हमला सुपारी लेकर किया गया था। अभिजीत चव्हाण, जिसे माली ने ब्लैकलिस्ट किया था, ने मलिक शेख को काम पर रखा। पुलिस ने अपराध से जुड़े सबूत मिलने के बाद दोनों को गिरफ्तार कर लिया।