इस्लामपुरात कोविड कामकाजाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:39+5:302021-04-11T04:26:39+5:30

इस्लामपूर : येथील कोविड उपाययोजना कामांची पाहणी केंद्रीय पथकाने केली. डॉ. प्रणवकुमार वर्मा पथकप्रमुख होते. त्यांच्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक ...

Inspection of Kovid operations in Islampur | इस्लामपुरात कोविड कामकाजाची पाहणी

इस्लामपुरात कोविड कामकाजाची पाहणी

इस्लामपूर : येथील कोविड उपाययोजना कामांची पाहणी केंद्रीय पथकाने केली. डॉ. प्रणवकुमार वर्मा पथकप्रमुख होते. त्यांच्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील, डॉ. संतोष पाटील उपस्थित होते.

या पथकाने कोविड केअर सेंटर, दत्त टेकडी, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय, आयुर्वेदिक रुग्णालय येडेनिपाणी, प्राथमिक आरोग्य केंद्र येलूर आदी ठिकाणी भेट देऊन कोविडबाबतचे कामकाज पाहिले. सर्व सुविधा, रुग्णांची सोय, उपलब्ध साहित्य व औषधपुरवठा, कोविड लसीकरणाचे कामकाज, कंटेनमेंट झोनमधील कामकाज पाहिले. यावेळी उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरसिंह देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणोजी शिंदे उपस्थित होते.

येडेनिपाणी येथे पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, सरपंच डॉ. सचिन पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ अंकोलीकर, तर येलूर येथे डॉ. दिलीप पाटील, ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार उपस्थित होते.

फोटो ओळी : इस्लामपूर येथील कोविड केंद्राची पाहणी करताना केंद्रीय पथक.

Web Title: Inspection of Kovid operations in Islampur