इंद्रजीत मोहिते वाढदिवस साजरा करणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:23 IST2021-04-26T04:23:13+5:302021-04-26T04:23:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरटे : भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित यशवंतराव मोहिते यांचा मंगळवारी (दि. २७) वाढदिवस ...

Inderjit Mohite will not be celebrating his birthday | इंद्रजीत मोहिते वाढदिवस साजरा करणार नाहीत

इंद्रजीत मोहिते वाढदिवस साजरा करणार नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरटे : भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित यशवंतराव मोहिते यांचा मंगळवारी (दि. २७) वाढदिवस आहे. यंदा साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचे प्रयोजन होते. परंतु अलीकडील आठवडाभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. अशा गंभीर परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे योग्य ठरत नसल्याने डॉ. मोहिते हे वाढदिवस साजरा करणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सर्वत्र निर्बंध आणले आहेत. गर्दी टाळण्याचेही आदेश आहेत. अशा बिकट व गंभीर परिस्थितीत प्रत्येकाने आपले आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून डॉ. इंद्रजीत मोहिते वाढदिवस साजरा करणार नाहीत. कार्यकर्ते व सभासदांच्या भावनात्मक शुभेच्छा स्वीकारल्या जातील. कोरोना संक्रमण परिस्थितीत कृपया प्रत्यक्ष भेटण्याचे टाळावे. त्याऐवजी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा द्याव्यात, असे डॉ. मोहिते यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

Web Title: Inderjit Mohite will not be celebrating his birthday