कसबे डिग्रजमधील गंजीखाना रस्त्याची उंची वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST2021-05-24T04:25:26+5:302021-05-24T04:25:26+5:30

लोकमत न्युज नेटवर्क कसबे डिग्रज : कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या कसबे डिग्रजला नेहमीच पुराचा धोका असतो. महापुरातून बाहेर जाण्यासाठी ...

Increase the height of Ganjikhana road in Kasbe Digraj | कसबे डिग्रजमधील गंजीखाना रस्त्याची उंची वाढवा

कसबे डिग्रजमधील गंजीखाना रस्त्याची उंची वाढवा

लोकमत न्युज नेटवर्क

कसबे डिग्रज :

कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या कसबे डिग्रजला नेहमीच पुराचा धोका असतो. महापुरातून बाहेर जाण्यासाठी असलेल्या गंजीखाना रस्त्याची पाच फुटांनी उंची वाढवा, अशी मागणी जि. प. सदस्य विशाल चौगुले यांनी केले.

डिग्रजमध्ये अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांनी संभाव्य पूरस्थितीबाबत आढावा बैठक घेतली. संभाव्य पूरपरिस्थितीमध्ये उपलब्ध असणारी साधने, आवश्यक तांत्रिक बाबी, लाईफ जॅकेट, यांत्रिक बोटी, लोकांची राहण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा या महत्त्वपूर्ण बाबीबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. पूर परिस्थितीत लोकांना गावाबाहेर जाण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्ग गंजीखाना रोडची उंची वाढवून रस्ता व्हावा यासाठी तहसीलदार अर्चना पाटील यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले ,सहायक गटविकास अधिकारी अशोक बांगर आदींनी पाहणी केली. यावेळी कुमार लोंढे, संजय शिंदे, उपसरपंच सागर चव्हाण यांनी चर्चेत सहभाग घेतला.

यावेळी संजय निकम, मंडल अधिकारी,विजय तोडकर, ग्रामविकास अधिकारी, आर. डी. शिंदे, तलाठी के. एल. रुपनार, डॉ. शरद कुंवर उपस्थित होते.

Web Title: Increase the height of Ganjikhana road in Kasbe Digraj