शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षातही जीएसटी वसुलीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST

सांगली : जीएसटी वाढीचा आलेख नव्या वर्षातही कायम राहिला असून गतवर्षाच्या तुलनेत यंदा जानेवारीतील महसुलात १ टक्क्याने अधिक वाढ ...

सांगली : जीएसटी वाढीचा आलेख नव्या वर्षातही कायम राहिला असून गतवर्षाच्या तुलनेत यंदा जानेवारीतील महसुलात १ टक्क्याने अधिक वाढ झाली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली तूट चालू आर्थिक वर्षात भरून निघण्याची शक्यता आहे.

जून २०२० पासून सुरू झालेला जीएसटी वाढीचा ट्रेंड ऑक्टोंबर २०२० पर्यंत सलग चौथ्या महिन्यातसुद्धा कायम होता. मात्र, नोव्हेंबरमध्ये किंचित घसरण झाली होती. पुन्हा डिसेंबर आणि जानेवारी २०२१ मध्ये जीएसटी वसुलीत वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्याच्या जीएसटी संकलनात जानेवारी २१ मध्ये १ टक्के वाढ दिसून येत आहे. ऑक्टोबरचा अपवादवगळता मागील वर्षीच्या तुलनेत जीएसटी संकलन वाढत आहे

मागील वर्षी जानेवारीत जीएसटीचे संकलन रु ६९.३५ कोटी इतके होते. जानेवारी २०२१ मध्ये ७० कोटी ४ लाख इतके संकलन झाले आहे. महसुलात सुमारे ६९ लाखांची वाढ झाली आहे.

एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या पहिल्या १० महिन्यांचा विचार करता जीएसटीचा महसूल हा मागील वर्षीपेक्षा अद्याप ६६ कोटी ४० लाखाने कमी आहे. जिल्ह्यात एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालखंडात ६९३.९१ कोटी इतका महसूल जमा झाला होता तर आता एप्रिल ते जानेवारी २०२१ या कालखंडात ६२७.५० कोटी महसूल जमा झाला आहे म्हणजेच चालू आर्थिक वर्षात १० महिन्यात ९.५० टक्के कमी महसूल जमा आहे.

सांगली जिल्ह्यात २५ हजार जीएसटी करदाते आहेत. त्यापैकी राज्य शासनाकडे १६ हजार तर केंद्र शासनाकडे ९ हजार करदाते आहेत. जिल्ह्यात साखर उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात महसूल येत आहे. बोगस बिल प्रकरणे, लेखापरीक्षण, १०० कोटींवर इ-इन्व्हॉइस आदी उपाययोजना सुरू झाल्या आहेत

विवरणपत्रात भरलेली माहिती इतर ऑनलाईन माहितीशी पडताळून करभरणा करून घेतला जात आहे. हा ट्रेंड जर असाच सुरू राहिला तर कोरोनामुळे होत असलेले नुकसान भरून निघण्याची शक्यता आहे.