शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेचा कहर; सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथे विद्यार्थ्यावर ‘करणी’, फोटोभोवती लिंबू, हळद-कुंकू, तांत्रिक साहित्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:32 IST

कष्टाने स्वतःचे शिक्षण पूर्ण करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका जिद्दी विद्यार्थ्याला अंधश्रद्धेच्या नावाखाली लक्ष्य केल्याचा संतापजनक प्रकार

आटपाडी : सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथे विज्ञानयुगालाही लाजवेल, अशी अंधश्रद्धेची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कष्टाने स्वतःचे शिक्षण पूर्ण करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका जिद्दी विद्यार्थ्याला अंधश्रद्धेच्या नावाखाली लक्ष्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली.खरसुंडीतील विराज नाना पाटील हा इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी असून, ‘अन्नपूर्णा नाष्टा सेंटर’ चालवत तो आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्याचे वडील अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेले आहेत. अशा कठीण परिस्थितीत शिक्षण आणि व्यवसाय यांचा ताळमेळ साधत विराजने गावात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहींच्या डोळ्यात हीच प्रगती खुपल्याची शक्यता व्यक्त होत आहे. बुधवारी सकाळी विराजच्या नाष्टा सेंटरसमोर अत्यंत विचित्र आणि अघोरी प्रकार उघडकीस आला. त्याच्या फोटोभोवती चार लिंबे, हळद-कुंकू, काळ्या रंगाच्या आकृत्या आणि काही तांत्रिक साहित्य ठेवण्यात आले होते. या दृश्याने नागरिकांच्या अंगावर काटा आला. हा प्रकार ‘भानामती’ किंवा करणी करण्यासाठीच केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

समाजकंटकांवरोधात कठोर कारवाईची मागणीया घटनेनंतर गावात विविध चर्चांना उधाण आले असून, हा सर्व प्रकार मत्सरातूनच घडवून आणल्याचा कयास बांधला जात आहे. या घटनेमुळे खरसुंडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून, दोषींना शोधून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. खरसुंडीतील ही घटना केवळ एका मुलावरचा अन्याय नसून, समाजाच्या विवेकबुद्धीला दिलेले आव्हान असल्याची भावना व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Superstition's Havoc: Student Targeted with Black Magic in Sangli

Web Summary : In Sangli's Kharsundi, a student supporting his family was targeted with black magic. Objects were found near his photo, sparking fear and outrage. Locals demand strict action against those responsible for this act of superstition.