सांगलीत लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

By शीतल पाटील | Updated: August 14, 2023 20:58 IST2023-08-14T20:58:46+5:302023-08-14T20:58:55+5:30

चौघांवर गुन्हा दाखल : विश्रामबाग येथील घटना

In Sangli, a young woman was raped by luring her into marriage | सांगलीत लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

सांगलीत लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

सांगली: लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर तीन वर्षे अत्याचार केल्याप्रकरणी मायणी येथील युवकासह त्याला साथ देणाऱ्या तिघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये प्रतिक बाळासो थोरात, वंदना थोरात, विकी पवार आणि दिपक कणसे यांचा समावेश आहे.

घटनेची माहिती अशी, पीडिता एका कंपनीत काम करते. काही वर्षापूर्वी संशयित प्रतिक थोरात याच्याशी तिची ओळख झाली. प्रतिकसह अन्य तिघांनी पीडितेस लग्नाचे आमिष दाखविले. त्याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले.

हा प्रकार दि. १६ एप्रिल २०२१ ते दि. १ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घडला. मध्यंतरी खानापूर तालुक्यातील माहुली येथे संशयितांनी पीडितेस लग्नाची बोलणी करण्याकरिता बोलवले. तेथे पीडितेस धक्काबुक्की करुन लग्न लावून देणे जमणार नसल्याचे सांगून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव तपास करीत आहेत.

Web Title: In Sangli, a young woman was raped by luring her into marriage