शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

गद्दारी कराल तर परिणाम भोगाल, भाजपच्या नूतन नगरसेवकांना चंद्रकांत पाटील यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:44 IST

केंद्रीय नेतृत्वाला फसवले तर काय होते, हे महाराष्ट्र उदाहरण आहे

सांगली : गतवेळी भाजपकडे बहुमत असतानाही काहीजणांनी गद्दारी केली, म्हणून पक्षाचा महापौर होऊ शकला नाही. यंदा महापालिका निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. पक्ष खूप प्रेम करते म्हणून कसेही वागून चालणार नाही. माझ्यापासून पक्षाचे नुकसान होणार नाही, याबाबतची दक्षता घ्या. गद्दारी कराल तर त्याचे परिणाम भोगावे लागेल. त्याचे महाराष्ट्र हे उदाहरण आहे, असे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नूतन नगरसेवकांना जणूकाही इशाराच दिला.महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन नगरसेवक व पराभूत उमेदवारांचा मेळावा सांगलीतील एका मंगल कार्यालयात झाला. यावेळी मंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सुरेश आवटी, बाळासाहेब यादव, विश्वजित पाटील उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, देशामध्ये २२ राज्यांमध्ये मुख्यमंत्री असणारा भाजप एकमेव पक्ष आहे. पक्षाने सारे काही देऊनही काहीजण गद्दारी करतात, तेव्हा त्रास होतो. मी धमकी देत नाही, तुम्हाला सावध करीत आहे. केंद्रीय नेतृत्वाला फसवले तर काय होते, हे महाराष्ट्र उदाहरण आहे. काही दिवसांत त्याचे परिणाम भोगावे लागतात. पक्ष खूप प्रेम करते म्हणून आपण कसेही वागून चालणार नाही. महापलिकेत नगरसेवक म्हणून कमिशन मिळवण्याची पतपेढी नव्हे. पद दिले म्हणून काहीही चालणार नाही. जुन्या आठवणी उगळून काढणार नाही. गतवेळी ४३ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सात नगरसेवक फुटल्याने सत्ता गमवावी लागली होती. आता गद्दारी खपवून घेणार नाही.पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, केवळ पाणी, गटर, रस्ते तितकंच आपलं काम नाही तर आपल्या शहराची, शहराच्या विकासाचे व्हिजन हे आपल्याकडे असले पाहिजे. त्यासाठी आपण खूप अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे, नेटवर बसलं पाहिजे. जगातली शहर ही कशी आहेत, त्यांनी काय केलं असा अभ्यास करून तेथील प्रकल्प राबविण्यासाठी मुख्यमंत्री, आमदारांकडे आग्रह धरला पाहिजे. यावेळी आ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांनीही मार्गदर्शन केले. संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.माणसांचा विकास करणारे उपक्रम राबवानगरसेवक म्हणून रस्ते, गटारी आदी नागरी समस्या सोडवायच्या आहेतच, पण केवळ तेच काम नाही. माणसांचा विकास करणारे उपक्रम हाती घेतले पाहिजे. शहराचे विकासाचे व्हिजन हवे. शासनाच्या निधीसह तुम्हाला सीएसआर फंडातून निधी मिळवून देऊ, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Sangliसांगलीchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा