शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

सेतू केंद्रांनी विद्यार्थ्यांकडून जास्त पैशाची आकारणी केल्यास फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 4:33 PM

सेतू केंद्रांनी विद्यार्थ्यांकडून विहित शुल्कापेक्षा जास्त पैशाची आकारणी केल्यास तहसिलदारांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे दिले.

ठळक मुद्देसेतू केंद्रांनी विद्यार्थ्यांकडून जास्त पैशाची आकारणी केल्यास फौजदारी गुन्हा सांगली जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांचे निर्देश

सांगली : सेतू केंद्रांनी विद्यार्थ्यांकडून विहित शुल्कापेक्षा जास्त पैशाची आकारणी केल्यास तहसिलदारांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे दिले.जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, सेतू केंद्रामार्फत अनेक प्रकारचे दाखले दिले जातात. मी ज्यावेळी या जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालो, त्यावेळी विद्यार्थ्यांकडून ठरलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क घेवून त्यांना लागणारे दाखले दिले जायचे, असे माझ्या निदर्शनास आले होते.मधल्या काळात सातत्याने सेतू केंद्रांची तपासणी करून सेतू केंद्रावर दंडात्मक कारवाई केली. तरीदेखील मराठा समाजाच्या एका शिष्टमंडळाने सांगितले आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून जास्त पैसे घेतले जातात.

ही बाब निषेधार्ह आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे सेतू केंद्राबाहेर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे संपर्क क्रमांक प्रदर्शित करावेत, असे सर्व उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांना लेखी स्वरूपामध्ये कळविण्यात आले आहे.

सेतू केंद्राच्या बाहेर जर एखाद्या विद्यार्थ्याकडून पैसे घेतले जात असतील, त्यांनी थेट आमच्याकडे तक्रार करावी, मात्र कुठल्याही सेतू केंद्राला विहित शुल्कापेक्षा जास्त पैसे देऊ नयेत. त्यांनी सेतू केंद्राची बारकाईने तपासणी करावी. अशा प्रकारे कोणी पैसे घेत असतील, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीStudentविद्यार्थीSangliसांगली