अजबच! रोकड, दागिने नाही तर, चोरट्यांनी पळवली गाढवं; मिरजेत तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 14:16 IST2022-11-09T14:16:12+5:302022-11-09T14:16:45+5:30

एक लाख पाच हजार किमतीची १४ गाढवे नेली चोरुन

If not the cash, the jewels, the donkey that the thieves ran away with; Crime against three suspects in Miraj | अजबच! रोकड, दागिने नाही तर, चोरट्यांनी पळवली गाढवं; मिरजेत तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा

संग्रहित फोटो

मिरज : मिरजेत बाजार समितीच्या मार्केट यार्डात जनावरांच्या गोठ्यात बांधून ठेवलेली एक लाख रुपये किमतीची १४ गाढवे चोरून नेण्यात आली. याबाबत सिकंदर बादशाह सय्यद (वय २७, रा.गांधी चौक, कैकाडी गल्ली, मिरज) यांनी लखन संजू माने, राजू कोंडीबा माने व सोमनाथ भारत जाधव यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.

सिकंदर सय्यद, त्याचे मित्र सनी तुळशीदास ताळेकर, सूरज पप्पू शेख यांनी मार्केट यार्डातील शेतकरी भवनजवळ असलेल्या जनावरांच्या खुल्या गोठ्यात रविवारी रात्री पांढऱ्या रंगाची सात व राखाडी रंगाची ७ अशी एक लाख पाच हजार किमतीची १४ गाढवे बांधून ठेवली होती. सोमवारी सकाळी शेख गोठ्यात गेल्यानंतर तेथे एकही गाढव नसल्याचे निदर्शनास आले.

शेख यांनी लखन माने, राजू माने आणि सोमनाथ जाधव या तिघांनी त्यांची गाढवे चोरून नेल्याची तक्रार गांधी चौक पोलिसात दिली आहे. याबाबत तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे

Web Title: If not the cash, the jewels, the donkey that the thieves ran away with; Crime against three suspects in Miraj