शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

"गाडी चुकली नाहीतर मंत्रिमंडळात असते", ठाकरेंच्या आमदारासाठी एकनाथ शिंदेंची सभा, सर्वांसमोर दिली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 21:06 IST

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेत आहेत. बार्शीत शिंदेंनी उद्धवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांच्यासाठी सभा घेतली.  यावेळी शिंदेनी सोपलांना थेट ऑफर दिली. 

"खाते कोणाचे पण असले तरी मी उपमुख्यमंत्री आहे, टेन्शन घेऊ नका. टेन्शन द्यायचे. दिलीप सोपल ७ वेळा निवडून आले. ८व्यांदा निवडून येतील. मागच्या वेळी झालेली चूक दुरुस्त करू. सोपल साहेबांचा मान सन्मान राखला जाईल. तुम्ही आमच्यासोबत या लगेच कारखाना सुरू करू", असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांना सभेतच ऑफर दिली. 

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत, पण कोणत्याही नेत्यांकडून याबद्दल खुलासा करण्यात आलेला नाही. अशातच उद्धवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली. 

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "दिलीप सोपल यांचे काम अनेकवर्षे विधानसभेत पाहिले आहे. दोन वेळा सभागृहात ते नव्हते, तरीही सभागृहाला चुकल्यासारखे वाटले. ते सर्वांचे मित्र आहेत. १९९५ मध्ये मंत्री होते. कामाचा माणूस आहे."

"दुःखाचे सावट आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने राज्यात दुःख आहे. पण, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आमच्या निवडणुका झाल्या. हे कार्यकर्ते आहेत, जे आम्हाला निवडून देतात. कार्यकर्त्याला अपेक्षा असतात की नेता आपल्याजवळ आला पाहिजे. कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणारा मी माणूस आहे. सोपल मनापासून दोस्ती करतात म्हणून मी या ठिकाणी आलो आहे", असे शिंदे म्हणाले. 

"लोक अजूनही बोलतात की लाडकी बहीण योजना बंद करणार. मी गरिबी पाहिली आहे. त्यामुळे मला गरिबीची जाण आहे. कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. शेतकरी अन्नदाता आहे. त्याला केंद्रबिंदु ठेवून आम्ही काम करतोय. कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. समितीचा अहवाल आला की कर्जमाफी करणार", असे शिंदेंनी सांगितले. 

"बार्शीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. दिलीप सोपल ७ वेळा आमदार झाले. त्यांची गाडी चुकली नाहीतर ते मंत्रिमंडळात असते. तुम्ही आमच्यासोबत या. लगेच संतनाथ कारखाना सुरू करू. मी जे बोललोय, त्यातील एक शब्दही इकडचा तिकडे होणार नाही", असे शिंदे म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Join us, you'd be in cabinet: Shinde offers Sopal

Web Summary : Eknath Shinde publicly offered Uddhav Sena MLA Dilip Sopal to join him, promising to restart the Santnath factory and ensure Sopal's respect. Shinde highlighted Sopal's experience and assured continued support for welfare schemes and farmer loan waivers, emphasizing commitment to Barshi's development.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDilip Sopalदिलीप सोपलUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६