शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
2
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
3
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
4
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
5
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
6
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
7
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
8
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
9
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
10
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
11
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
12
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
13
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
14
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
15
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
16
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
17
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
18
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
19
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
20
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात

Crime News Sangli: चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा खून, संशयितास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:05 IST

बोलण्याच्या ओघात बेसावध असल्याची संधी साधत रागाच्या भरात सुनीलने हातानेच गळा आवळून तिला मारून टाकले.

इस्लामपूर : तुजारपूर (ता. वाळवा) येथील प्रियांका सुनील गुरव (वय २८) या महिलेच्या खुनाचा उलगडा झाला असून, पोलिसांनी तिचा पती सुनील तानाजी गुरव (३१) याला गुरुवारी अटक केली. पत्नी बाहेरख्याली असल्याच्या रागातून हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी दिली.सुनील गुरव गृहरक्षक दलामध्ये जवान म्हणून सेवा बजावत होता. खुनाची घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वाघवाडी-शिवपुरी रस्त्यावरील तानाजी बांदल यांच्या शेतामध्ये घडली. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास ती उघडकीस आली.साळुंखे म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांपासून सुनील आणि प्रियांकामध्ये वारंवार भांडण होत असे. गेल्या १५ दिवसांपासून ती घराबाहेरच होती. या काळात इस्लामपूर बसस्थानक परिसरात तिचा वावर असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी रात्री सुनीलने इस्लामपूर बसस्थानकावर येऊन प्रियांकाला गोड बोलून तुुझ्यासोबत चर्चा करायची आहे, असे म्हणत तिला दुचाकीवरून बांदल यांच्या शेतामध्ये निर्जनस्थळी नेले.तेथे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत तिला बोलण्यात गुंतवून ठेवली. ती बोलण्याच्या ओघात बेसावध असल्याची संधी साधत रागाच्या भरात सुनीलने हातानेच गळा आवळून तिला मारून टाकले. ती मृत झाल्याची खात्री होत नसल्याने तिचे डोके जमिनीवर आदळले. ती पालथ्या अवस्थेत पडली असताना सुनीलने तेथून पलायन केले.ही घटना समजल्यानंतर प्रियांकाची ओळख पटविण्याचा कोणताच पुरावा दिसून येत नव्हता. मात्र तिच्याजवळच्या साहित्यामध्ये इस्लामपूर पोलीस ठाणे आणि क्रमांक असलेली चिठ्ठी मिळून आली. या अक्षराची खातरजमा केल्यावर पोलीस कर्मचारी योगेश जाधव यांचे हे अक्षर असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी येऊन जाधव यांनी ओळख पटवत मृत महिलेचे नाव प्रियांका सुनील गुरव असे असल्याचे सांगितले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सुनील गुरव याचा शोध घेत तुजारपूर गावामध्येच त्याला ताब्यात घेतले. शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी