शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

लक्ष्मी मार्केटच्या भाड्यामध्ये दरवर्षी दीड कोटीचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:57 PM

महापालिकेस मिरजेतील लक्ष्मी मार्केटमधील १६५ गाळ्यांचे केवळ ६ लाख २४ हजार रुपये वार्षिक भाडे मिळत आहे. प्रतिवर्षी सुमारे दीड कोटी रुपयांचा घोटाळा लक्ष्मी मार्केटच्या भाड्यात होत असल्याचा आरोप सेव्ह मिरज सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : ‘सेव्ह मिरज सिटी’च्या पदाधिकाऱ्यांची तक्रार

मिरज : महापालिकेस मिरजेतील लक्ष्मी मार्केटमधील १६५ गाळ्यांचे केवळ ६ लाख २४ हजार रुपये वार्षिक भाडे मिळत आहे. प्रतिवर्षी सुमारे दीड कोटी रुपयांचा घोटाळा लक्ष्मी मार्केटच्या भाड्यात होत असल्याचा आरोप सेव्ह मिरज सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

मिरजेतील तत्कालीन संस्थानिकांनी नागरिकांच्या सोयीसाठी व पालिकेच्या कामगारांच्या पगाराच्या व्यवस्थेसाठी लक्ष्मी मार्केट व्यापारी संकुल बांधून ते नगरपालिकेकडे हस्तांतरित केले. लक्ष्मी मार्केटमध्ये सुमारे १६५ दुकाने व स्टॉल असून त्यांच्या भाड्यापोटी महापालिकेस दरवर्षी केवळ ६ लाख उत्पन्न मिळत आहे. लक्ष्मी मार्केट या मोक्याच्या जागेत बाजारभावाप्रमाणे किमान एका दुकानाचे भाडे १ लाख रुपये प्रतिवर्ष होईल. या परिसरात दुकान गाळ्याची किंमत आज २० ते ४० लाखादरम्यान आहे. बाजारभावाप्रमाणे महापालिकेस किमान १ कोटी ६५ लाख रुपये भाडे मिळाले पाहिजे. मात्र सर्व दुकानदारांकडून महापालिकेस केवळ ६ लाख २४ हजार रुपये मिळतात. यामुळे प्रतिवर्षी सुमारे दीड कोटी रुपयांचा घोटाळा फक्त लक्ष्मी मार्केटच्या भाड्यात होत आहे. महापालिकेची संपत्ती कमी भावात कारभाºयांकडून कांही बगलबच्च्यांना देण्यात येत असल्याचा आरोप सेव्ह मिरज सिटीतर्फे यावेळी करण्यात आला.

माहिती अधिकारात प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मी मार्केटमधील ५१ दुकान गाळ्यांचे ४ लाख ३६ हजार, लक्ष्मी मार्केटच्या आतील व कमानीतील ४६ दुकान गाळ्यांचे १ लाख ८ हजार, लक्ष्मी मार्केटच्या ६८ भाजीपाला स्टॉलचे ८० हजार, चप्पल बाजारातील ४५ दुकानांचे ६७ हजार रुपये वार्षिक उत्पन्न मिळते. या भाडेचोरीची दखल घेऊन महापालिकेच्या मालमत्तेचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापालिकेची मालमत्ता काही ‘खास’ लोकांना नाममात्र भाड्यात देऊन तेथे पोटभाडेकरू निर्माण केल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. लक्ष्मी मार्केटप्रमाणे महापालिकेच्या मालकीच्या अन्य व्यापारी संकुलात बाजारभावाप्रमाणे भाडे आकारणी केल्यास सुमारे १५ कोटी रुपये उत्पन्न महापालिकेस मिळणे अपेक्षित आहे. परंतु महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम सुरु असल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी अ‍ॅड. श्रीकृष्ण पोतकुळे, अ‍ॅड. ईर्शाद पालेगार, अ‍ॅड. दीपक नांगरे-पाटील, तानाजी रूईकर, सुशील माळी, शकील शेख, गणेश स्वामी, संतोष कदम, असिफ मुजावर उपस्थित होते.लेखापालांचे दुर्लक्षमहापालिकेचे लेखापालही या नुकसानीस आक्षेप घेत नाहीत. नगरसेवक बगलबच्च्यांच्या फायद्यासाठी भाडे वाढविण्यास विरोध करीत असल्याने आयुक्त, उपायुक्त यांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली