शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

फुकटची फौजदारी करायची तरी किती दिवस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:48 IST

सांगली : जिल्ह्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांचे दोन महिन्यांचे मानधन थकित आहे. भत्ता मिळाला नाही, तर पोट भरायचे कसे? असा ...

सांगली : जिल्ह्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांचे दोन महिन्यांचे मानधन थकित आहे. भत्ता मिळाला नाही, तर पोट भरायचे कसे? असा त्यांचा सवाल आहे. कुटुंबातील सदस्यांना अर्धपोटी ठेवून ते सामाजिक स्वास्थ्यासाठी रात्रं-दिवस रस्त्यावर उभे राहत आहेत.

होमगार्डंना दहा तासांच्या ड्युटीसाठी ६७० रुपये भत्ता मिळतो. जिल्ह्यात १२०० पुरुष आणि ७० महिला होमगार्ड आहेत. गेल्या डिसेंबर व जानेवारीचे मानधन मिळालेले नाही. शासनाकडून निधी मिळाला नसल्याने ही स्थिती ओढवली आहे. बिनपगारी राबायला लागत असल्याने होमगार्ड ड्युटी नाकारत आहेत. मिरज उपविभागात शिवजयंतीसाठी १०० जणांची मागणी होती, प्रत्यक्षात फक्त ४६ जणच हजर झाले. जिल्हाभरात कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. लॉकडाऊन काळात पोलिसांच्या बरोबरीने ते रस्त्यावर राहिले, काहीजण कोरोनाबाधितही झाले; पण त्यांना कोणतीही मदत किंवा भरपाई मिळाली नाही.

पन्नास वर्षांवरील होमगार्डंना आरोग्याच्या कारणास्तव ड्युटी नाकारली गेली, त्यामुळे त्यांचे आणखी हाल झाले. सध्या फिटनेस प्रमाणपत्र असेल, तरच ड्युटीवर घेतले जात आहे. फेब्रुवारी महिन्यात ड्युटीवर घेणे नियोजित होते, पण निधी नसल्याने नेमणूक झाली नाही.

कोट

ड्युटीच्या भत्त्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही लाभ मिळत नाहीत. सलग महिनाभर ड्युटीही मिळत नाही. या स्थितीत होमगार्ड म्हणून पूर्णवेळ काम करणे आर्थिक कोंडी करणारे ठरते.

- होमगार्ड, मिरज

कोट

डिसेंबरपासून भत्ते मिळालेले नाहीत. कोरोना काळात जीव धोक्यात घालून ड्युटी केली, त्याचीही वेगळी दखल शासनाने घेतली नाही. ड्युटी नसलेल्या काळात सुरक्षारक्षक म्हणून खासगी काम करून कुटुंब चालवतो.

- होमगार्ड, सांगली

कोट

पन्नास वर्षांपेक्षा जास्त वय झाल्याने ड्युटी मिळाली नाही. फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच ड्युटीवर जाता येईल. दररोज ड्युटी मिळाली, तरच महिन्याकाठी पुरेसे पैसे मिळू शकतात.

- होमगार्ड, सांगली

कोट

शासनाकडून निधी आलेला नसल्याने भत्ते देता आलेले नाहीत. जिल्ह्याची एकूण थकित रक्कम सुमारे अडीच कोटी रुपये आहे. महिन्याभरात निधी येण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर त्वरित भत्ते अदा केले जातील.

- मधुकर शिंदे, स्टाफ ऑफिसर

चौकट

महिन्याला सरासरी आठवडाभराचे काम होमगार्डला मिळते. कोरोना व लॉकडाऊन काळात तर तेदेखील मिळणे मुश्किल झाले होते. डिसेंबरनंतर थेट फेब्रुवारीमध्येच म्हणजे शिवजयंतीलाच काम मिळाले. १८ ते २० फेब्रुवारी अशी ड्युटी मिळाली. त्यातही ५० वर्षांवरील होमगार्डना फिटनेस प्रमाणपत्र नसल्यास ड्युटी नाकारण्यात आली.

पाॅईंटर्स

जिल्ह्यात होमगार्डची संख्या १२७०

दोन महिन्यांचे मानधन थकित - २.५ कोटी रुपये