Sangli: आक्कळवाडीत घराला आग, बालिकेचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 12:39 IST2024-04-11T12:38:59+5:302024-04-11T12:39:34+5:30
जत : आक्कळवाडी (ता. जत) येथील छप्परवजा घराला अचानक लागलेल्या आगीत १ वर्षाची बालिका अनन्या आडव्याप्पा कळीमठ (वय १ ...

Sangli: आक्कळवाडीत घराला आग, बालिकेचा होरपळून मृत्यू
जत : आक्कळवाडी (ता. जत) येथील छप्परवजा घराला अचानक लागलेल्या आगीत १ वर्षाची बालिका अनन्या आडव्याप्पा कळीमठ (वय १ वर्ष) हिचा होरपळून मृत्यू झाला. यावेळी बालिकेला वाचवताना तिचे आजोबा मल्लाप्पा यांचे हात भाजले आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. याबाबतची फिर्याद प्रकाश वालेकर यांनी उमदी पोलिसात दिली आहे.
आक्कळवाडी येथील कळीमठ कुटुंबीय मयत बालिका अनन्या हिला घरात कापडी झोपाळ्यात झोपवून बुधवारी रात्री घरासमोरील अंगणात झोपी गेले होते. दरम्यान, बुधवारी रात्री घराला अचानक आग लागली. या आगीत अनन्याचा मृत्यू झाला. घरातील सर्व संसारोपयोगी साहित्यही जळून खाक झाले आहे.