शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्टोबर छाटणीची तासगावात लगबग

By admin | Updated: September 15, 2014 23:56 IST

आगाप छाटण्या सुरूच : चांगल्या दरासाठी प्रयत्न

अमित काळे - तासगाव --द्राक्षपंढरी असणाऱ्या तासगाव तालुक्यात आता आॅक्टोबर छाटणीची लगबग सुरू झाली आहे. काही ठिकाणी आगाप छाटण्याही घेण्यात येत असल्याचे चित्र आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने द्राक्षबागायतदारांत समाधानाचे वातावरण आहे.द्राक्षाच्या एकूण कार्यक्रमामध्ये आॅक्टोबर छाटणी हा महत्त्वाचा टप्पा आहे. छाटणीनंतर थेट फुलोरा तयार होऊन द्राक्षमणी तयार होण्यास सुरुवात होत असते. येथून पुढचा काळ हा द्राक्षबागेसाठी महत्त्वाचा असतो. छाटणीचा हंगाम अगदी नोव्हेंबरपर्यंत असला तरी, आगाप छाटण्या घेऊन द्राक्षे लवकर बाजारात आली पाहिजेत, या उद्देशाने लवकर छाटण्या घेण्यावर काही बागायतदारांचा भर असतो.बाजारात लवकर द्राक्षे आली की, द्राक्षाला चांगला दर मिळतो. हा दर पदरात पाडून घेण्यासाठी बागायतदार नवनवीन प्रयोगही करीत असतात. आगाप छाटण्या घेणारे बागायतदार १५ आॅगस्टपासूनही तयार असतात. किरकोळ प्रमाणात या छाटण्या घेण्याचे काम सुरू आहे. छोट्या बागायतदाराला ते शक्यही आहे.तालुक्यात अलीकडच्या काळात वेगाने वाढणारे द्राक्षबागेचे क्षेत्र निसर्गाच्या लहरीपणामुळे कमी झाले आहे. नवा शेतकरी, बागायती शेती करताना उसाला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. तरीही मूळचेच मोठे क्षेत्र असणारा तासगाव तालुका आहे. सुमारे १८ ते २० हजार एकरपेक्षा जास्त क्षेत्र केवळ द्राक्षबागेचे आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने विहिरी, कूपनलिका, ओढे, ओढ्यांवरील बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात पाणी कमी पडणारही नाही. छाटण्या करण्यासाठी आधी द्यायची खते, पाला काढणे, मजुरांची जुळवाजुळव करणे या कामाला बागायतदार लागला आहे.