शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जेवढी वसुली, तेवढाच पगार!

By admin | Updated: July 31, 2015 01:14 IST

महापालिकेचे नवे धोरण : २१७ कोटींच्या थकबाकीचा डोेंगर

सांगली : महापालिकेच्या घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता व एलबीटी या चारही विभागांची एकूण थकबाकी आता २१७ कोटीच्या घरात गेल्याने प्रत्येक विभागाला जेवढी वसुली, तेवढाच पगार देण्याचे धोरण स्थायी समितीच्या आढावा बैठकीत घेण्यात आले. स्थायी समिती सभापती संजय मेंढे यांनी गुरुवारी तातडीची आढावा बैठक आयोजित केली होती. महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी विभागनिहाय वसुलीचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. दोनशे कोटीच्या वर थकबाकी असेल, तर महापालिकेचा कारभार व जनतेसाठीच्या सुविधा कशा देता येणार?, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. यापुढे ज्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वसुलीच्या प्रमाणातच पगार देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. सभापतींनी तशा सूचना आयुक्तांना दिल्या. एलबीटीच्या विषयावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सवलत देऊनही व्यापारी, उद्योजक कर भरत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. ३१ जुलैपर्यंत शासनाने अभय योजनेला मुदत दिल्याने १ आॅगस्टपासून थकबाकीदार व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक रमेश वाघमारे यांनी दिली. एलबीटीची सध्याची एकूण थकबाकी १२५ कोटीच्या घरात आहे. घरपट्टी विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या ५७ कोटीवर थकबाकी आहे. घरपट्टी वसुलीसाठी सुरू असलेल्या कारवाईची माहिती अधीक्षक सुनील नाईक यांनी दिली. मालमत्ता विभागाच्या चर्चेवेळी अनधिकृत खोक्यांवरून जोरदार चर्चा झाली. मालमत्ता विभागाचे प्रमुख रमेश वाघमारे यांनी, खोक्यांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. थकबाकीदार २५0 खोकीधारक व गाळेधारकांना अंतिम नोटिसा देण्यात आल्या असून नोटिसीची मुदत संपताच संबंधित गाळे व खोकी सील करण्यात येणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. पाणीपट्टी विभागानेही २५0 थकबाकीदारांना नोटिसा बजावल्याची माहिती यावेळी दिली. जो विभाग जेवढी वसुली करेल, तेवढाच पगार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)