शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्याला पावसाचा तडाखा; मिरजेत वादळी वाऱ्याचा कहर, घरावर झाड कोसळले, पत्रे उडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:51 IST

वादळी पावसाचा मिरज, पलूस तालुक्यांना तडाखा

सांगली : मिरज आणि पलूस तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने बुधवारी आणि गुरुवारी जोरदार हजेरी लावली, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. मिरजच्या पूर्व भागात बुधवारी रात्री वादळामुळे घरांची छते उडाली आणि झाडे कोसळून सुमारे २० वीज खांब पडल्याने शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. ईदगाह परिसरात घरावर झाड कोसळल्याची घटना घडली. गुरुवारी पलूस तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे द्राक्षबागांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले.गुरुवारी दुपारी पलूस तालुक्यात गारांसह पाऊस पडल्यामुळे द्राक्षबागा आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. अवघ्या २५ मिनिटांच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या पिकांवर पाणी फिरले. गहू, हरभरा, शाळू आदी पिकांसह द्राक्षबागांचेही नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी शेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

टाकळी, सुभाषनगर, मालगाव आणि बोलवाडला वादळी वाऱ्याचा तडाखाटाकळी : टाकळी, सुभाषनगर, मालगाव आणि बोलवाड परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान झाले. सुभाषनगर येथील द्राक्ष व्यापारी महंमद हसन पाशा बेळगे यांच्या घर आणि कार्यालयावरील पत्रे उडून गेल्याने सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. तलाठी आणि महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सुभाषनगर परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली. कर्नाटकातून द्राक्ष व्यापारासाठी आलेले पाशा बेळगे यांचे घर आणि कार्यालयाचे पत्रे संपूर्ण सांगाड्यासह सुमारे २०० फुटावर जाऊन पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की पत्र्याच्या शेडमध्ये उभी असलेली चारचाकी गाडीही वाऱ्यामुळे भिंतीवर आदळली, ज्यामुळे भिंतीचेही नुकसान झाले. तसेच कार्यालयातील एसी, लॅपटॉप, संगणक, टीव्ही आणि फर्निचरचे मोठे नुकसान झाले. वाऱ्याच्या जोरामुळे कार्यालयातील साहित्यही उडून गेले. दरम्यान, द्राक्ष पॅकिंगसाठी आणलेले सुमारे तीन लाख रुपयांचे रंगीबेरंगी कागद गोडाउनमध्ये ठेवले होते. मात्र, गोडाउनवरील पत्रे उडाल्याने पावसाच्या पाण्यात हे सर्व कागद भिजून पूर्णपणे खराब झाले. या वादळात अरुण गडकरी यांच्या गोठ्याचे पत्रे उडून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले, तर नंदीवाले वस्तीतील हर्षला बाबर यांच्या घराचेही पत्रे उडून एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्कल बाळकृष्ण नागरगोजे आणि तलाठी नागेश वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे.

पॅकिंग साहित्याचे मोठे नुकसानपाशा बेळगे यांनी द्राक्ष पॅकिंगसाठी नुकतेच तीन लाख रुपयांचे कागद खरेदी केले होते. मात्र, वादळी पावसामुळे हे सर्व कागद भिजल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.

त्वरित मदतीची मागणीटाकळी, बोलवाड आणि सुभाषनगर परिसरात पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामा पूर्ण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सोसायटीचे चेअरमन अरुण गडकरी, माजी उपसरपंच सुलेमान मुजावर आणि ग्रामपंचायत सदस्य मनोज नांद्रेकर यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli District Hit by Rain; Storm in Miraj Causes Havoc

Web Summary : Heavy rain and storms lashed Sangli district, causing damage in Miraj and Palus. Houses were damaged, trees uprooted, power disrupted. Grape and other crops suffered significant losses. Immediate compensation is requested for affected farmers.