प्रवाशांची मोठी गर्दी, मुंबई-कोल्हापूर दरम्यान विशेष रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 11:50 IST2023-03-10T11:49:36+5:302023-03-10T11:50:18+5:30

गाडीला पंधरा स्लीपर क्लास, दोन जनरल सेकंड क्लास बोगी

Heavy rush of passengers, special train between Mumbai Kolhapur | प्रवाशांची मोठी गर्दी, मुंबई-कोल्हापूर दरम्यान विशेष रेल्वे

प्रवाशांची मोठी गर्दी, मुंबई-कोल्हापूर दरम्यान विशेष रेल्वे

मिरज : रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने मध्य रेल्वेने दि. ११ रोजी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. विशेष रेल्वे दि. ११ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल.

ही रेल्वे त्याच दिवशी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी कोल्हापूर येथे पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, चिंचवड, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज स्थानकात थांबेल. या गाडीला पंधरा स्लीपर क्लास, दोन जनरल सेकंड क्लास बोगी आहेत.

Web Title: Heavy rush of passengers, special train between Mumbai Kolhapur