सांगली: आष्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, नागरिकांची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 17:12 IST2022-09-06T17:11:37+5:302022-09-06T17:12:14+5:30

गेल्या काही दिवसापासून उघडीप घेतलेल्या पावसाने सणासुदीतच पुन्हा हजेरी लावली आहे.

Heavy rain in Ashta of Sangli district | सांगली: आष्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, नागरिकांची उडाली तारांबळ

सांगली: आष्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, नागरिकांची उडाली तारांबळ

आष्टा : आष्टा शहरात ढगफुटी सदृश्य जोरदार पाऊस झाला. अनेक घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या काही दिवसापासून उघडीप घेतलेल्या पावसाने सणासुदीतच पुन्हा हजेरी लावली आहे.

शहरात दुपारी १ च्या दरम्यान अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली. वीज वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. तब्बल दोन ते अडीच तास झालेल्या पावसामुळे शहरातील मुख्य नाला तुडुंब भरून वाहू लागला. तसेच मटन मार्केट चौक, तिरंगा चौक, कटारे गल्ली परिसरातील अनेक घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

आष्टा नगरपालिकेने गोरडे चौकातील गटारी मोठ्या केल्याने या ठिकाणी पाणी साठले नाही. मात्र काही सखल भागात पाणी साठल्याने घरात पाणी गेले. वादळी पावसामुळे पेठ सांगली रस्त्यावरील आष्टा एसटी स्टॅन्ड समोर रस्त्यावर पाणी साठले. रस्त्यावर अचानक पाणी वाहनधारकांना कसरत करत वाहतूक करावी लागली. ऐन गणेशोत्सवातच पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने नागरिकांचा हिरमोड झाला.

Web Title: Heavy rain in Ashta of Sangli district