निरोगी शरीर हेच सुखी जीवनाचे सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:25+5:302021-02-05T07:25:25+5:30

आष्टा : धकाधकीच्या जीवनात निरोगी शरीर हेच खरे सुखी जीवनाचे गमक आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील किडनी विकारतज्ज्ञ डॉ. ...

A healthy body is the key to a happy life | निरोगी शरीर हेच सुखी जीवनाचे सूत्र

निरोगी शरीर हेच सुखी जीवनाचे सूत्र

आष्टा : धकाधकीच्या जीवनात निरोगी शरीर हेच खरे सुखी जीवनाचे गमक आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील किडनी विकारतज्ज्ञ डॉ. अभिजित कोराने यांनी व्यक्त केले.

आष्टा डॉक्टर्स असोसिएशनतर्फे आयोजित वैद्यकीय चर्चासत्रात ‘किडनी विकार व घ्यावयाची काळजी’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शेखर भिसे यांनी ‘हृदयरोग व आधुनिक उपचार’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी हृदयरोग शल्यविशारद डॉ. किशोर देवरे उपस्थित होते.

आष्टा डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष डॉ. प्रवीण कोळी, उपाध्यक्ष डॉ. विजय गंगधर, डॉ. शिवाजी बंके, डॉ. मनोहर कबाडे, डॉ. विक्रम अनुसे, डॉ. सतीश बापट, डॉ. आर. एस. चौगुले, डॉ. दीपक लिगाडे, डॉ. अनिल निर्मळे, डॉ. दिग्विजय पाटील, डॉ. सुमित कबाडे, डॉ. संतोष व्हटकर, डॉ. प्रवीण वंजाळे, डॉ. धवल मालगावे, डॉ. सुहास गावडे, डॉ. तुषार कणसे, डॉ. सुनील वाळवेकर, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. सुनील मस्केपाटील, डॉ. साधना मालगावे उपस्थित होते. डॉ. धनपाल वठारे यांनी स्वागत केले. डॉ. प्रगती पाटील यांनी आभार मानले.

चाैकट

किडनी आणि हृदयाचे आरोग्य जपा

उत्तम आरोग्यासाठी किडनीचे कार्य उत्तम असणे महत्त्वाचे आहे. उच्च रक्तदाब, शुगर यासारख्या आजाराने समाजातील प्रत्येक घटक त्रस्त झाला आहे. न कळत अशा आजारांकडे दुर्लक्ष केल्यानेच किडनीचे विकार जडत जातात. त्यामुळे किडनी आणि हृदय यांचे आरोग्य जपणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले.

फोटो-०३आष्टा१

फोटो : आष्टा येथे डॉ. अभिजित कोराने यांचा डॉ. प्रवीण कोळी यांनी सत्कार केला. यावेळी डॉ. विजय गंगधर, डॉ. मनोहर कबाडे, डॉ. सतीश बापट, डॉ. विक्रम अनुसे आदी.

Web Title: A healthy body is the key to a happy life