दुचाकीच्या पेट्रोल टाकीत काडी पेटवून टाकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:30 IST2021-08-19T04:30:37+5:302021-08-19T04:30:37+5:30

सांगली : शहरातील शंभर फुटी रोडवर दारूच्या नशेत दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीत काडी पेटवून टाकल्याने एकजण जखमी झाला. या प्रकरणी ...

He lit a stick in the petrol tank of the two-wheeler | दुचाकीच्या पेट्रोल टाकीत काडी पेटवून टाकली

दुचाकीच्या पेट्रोल टाकीत काडी पेटवून टाकली

सांगली : शहरातील शंभर फुटी रोडवर दारूच्या नशेत दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीत काडी पेटवून टाकल्याने एकजण जखमी झाला. या प्रकरणी संतोष नारायण वाघमोडे (रा. महसूल कॉलनी, शामरावनगर, सांगली) यांनी प्रकाश तम्मा आरगे (रा. साई कॉलनी, शामरावनगर) याच्याविरोधात शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवार (दि. १६) सायंकाळी सहाच्या सुमारास शंभर फुटी रोडवरील हॉटेल मेजवानीसमोर असलेल्या एका देशी दारूच्या दुकानासमोर हा प्रकार घडला. संशयिताने दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीचे झाकण उघडून त्यात काडी पेटवून टाकली. अचानक झालेल्या या घटनेत फिर्यादी संतोष जखमी झाला. दारूच्या नशेत संशयिताने असे कृत्य केल्याने दुचाकीचेही नुकसान झाले. या प्रकरणी जखमी संतोषने सांगली शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: He lit a stick in the petrol tank of the two-wheeler