राजेवाडीच्या साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्षांवर गुन्हा-खोट्या सह्या कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:07 PM2018-05-24T23:07:17+5:302018-05-24T23:07:17+5:30

कारखान्याचे सभासद होण्यासाठी शेतकºयांनी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन आणि खोट्या सह्या करुन कर्ज काढून परस्पर रक्कम हडप केल्याप्रकरणी राजेवाडी

Guilty-False Loan on President of Rajwadi Sugar Factory, Vice President | राजेवाडीच्या साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्षांवर गुन्हा-खोट्या सह्या कर्ज

राजेवाडीच्या साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्षांवर गुन्हा-खोट्या सह्या कर्ज

Next
ठळक मुद्देकारखान्याचे सभासद होण्यासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर

आटपाडी : कारखान्याचे सभासद होण्यासाठी शेतकºयांनी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन आणि खोट्या सह्या करुन कर्ज काढून परस्पर रक्कम हडप केल्याप्रकरणी राजेवाडी (ता. आटपाडी) येथील सद्गुरु श्री श्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांच्यासह सांगलीच्या कॅनरा बँकेचे शाखाधिकारी आणि बँकेच्या अधिकाºयांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अनेक शेतकºयांची अशी फसवणूक केली आहे.

या गुन्ह्यात कारखान्याचे अध्यक्ष शेषगिरी राव (रा. पुणे), उपाध्यक्ष बाळासाहेब कर्णवर (पाटील, रा. गोरडवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर), संचालक श्रावण वाक्षे (रा. आटपाडी), कॅनरा बँकेचे सांगलीचे शाखाधिकारी व त्यांचे इतर अधिकारी यांच्यावर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शेतकरी विभिषण महादेव शिरकांडे (रा. राजेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०१० ते २०१७ च्या आॅगस्ट महिन्याच्या दरम्यान सद्गुरू श्री श्री सहकारी साखर कारखाना राजेवाडी येथे सुरू करताना सभासद होण्याकरिता आमच्याकडून पूर्वी घेण्यात आलेली शेजमिनीची कागदपत्रे, ओळखीचे पुरावे, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र यांच्या झेरॉक्स बॅँकेत कर्ज काढण्यासाठी उपयोगात आणल्या आहेत.

बॅँकेच्या अधिकाºयांशी संगनमत करून खोट्या सह्या करून कॅनरा बॅँकेत खाते (क्रमांक १६१३१०१०३४००४ व १६१३८४५००११३५) उघडून त्या खात्यात ३ लाख रुपये कर्ज घेतले. ती रक्कम परस्पर कारखान्याच्या नावावर जमा करून फसवणूक केली. या सर्वांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६५, ४६७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अनेक शेतकºयांची फसवणूक केलेल्या याप्रकरणी तपास सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत.

Web Title: Guilty-False Loan on President of Rajwadi Sugar Factory, Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.