शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात गणेश आरतीतही गट-तट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2015 00:02 IST

शहरासह परिसरातील गणेश मंडळांनी महाप्रसाद आणि देखाव्यावर पैसे खर्च न करता आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

अशोक पाटील -इस्लामपूर शहरासह ग्रामीण भागातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या गटाच्या युवा नेत्यांना आरतीचा मान दिला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांना मंडळाच्या गणेशाच्या आरतीला आणण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने का होईना, ते युवकांचे आयडॉल बनले आहेत. त्यांनी मंगळवारी तब्बल ६0 मंडळांच्या गणेशाची आरती केली. राज्यातील दुष्काळाचे सावट वाळवा तालुक्यावरही दिसू लागले आहे. बाजारपेठा ओस पडल्या आहेत. गणेशमूर्तींची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने मूर्तीकारांना शेवटच्या टप्प्यात किमती कमी करून गणेशमूर्तींची विक्री करावी लागली. शहरासह परिसरातील गणेश मंडळांनी महाप्रसाद आणि देखाव्यावर पैसे खर्च न करता आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. बहुतांशी मंडळांना जयंत पाटील यांच्यासह प्रत्येक गटाच्या नेत्यांनी मदत केली आहे. त्यामुळे त्या-त्या गटाच्या नेत्यांना आरतीसाठी आमंत्रित केले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक, जिल्हा परिषदेचे सदस्य सम्राट महाडिक, जि. प.चे माजी अध्यक्ष देवराज पाटील, वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी, माजी आ. विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव व विशाल शिंदे, शिराळा तालुक्यातून माजी आ. मानसिंगराव नाईक यांचे चिरंजीव विराज नाईक, आमदार शिवाजीराव नाईक यांचे पुत्र रणधीर नाईक, काँग्रेसचे नेते सत्यजित देशमुख यांना आरतीसाठी मोठी मागणी आहे.इस्लामपूर शहरातील नगरसेवक संजय कोरे, कपिल ओसवाल, शहाजी पाटील, माजी नगरसेवक शिवाजी पवार, विक्रम पाटील, संजय पाटील, राजवर्धन अशोक पाटील यांना, त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांकडून आरतीला येण्यासाठी आग्रह केला जात आहे.राजकीय वारसदार कोण?आ. जयंत पाटील व त्यांचे ज्येष्ठ पुत्र प्रतीक पाटील यांनी मंगळवारी रात्री इस्लामपूर शहरातील ६0 गणेश मंडळांच्या आरतीस हजेरी लावली़ मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या दोघा पिता-पुत्रांचे जल्लोषात स्वागत केले. पाटील यांनी दोन्ही मुलांना राजकारणापासून दूर ठेवले आहे. सामाजिक कार्यक्रमात ते दोघांनाही सोबत घेऊन वावरत आहेत. त्यामुळे राजवर्धन व प्रतीक राजकारणात सक्रिय होणार का, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.