सांगली : सात वर्षांपूर्वी तुम्ही राजकारणात आलात ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच. अन्यथा तुम्हाला कोणी ओळखलेही नसते. मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची तुमची पात्रता आहे का, असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुहास बाबर यांना केला.खानापूर तालुक्यातील आळसंद येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत त्यांनी बाबर यांच्या वक्तव्यावर मत मांडले. ते म्हणाले, सत्तेचा अन् राजकारणाचा अहंकार चांगला नसतो. भल्याभल्यांना तो रसातळाला नेतो. रावणालाही असाच अहंकार झाला होता. रावणाची लंका जळून गेली. रावणाची अशी अवस्था होत असेल तर तुम्ही आम्ही कोण? टीका करताना काही भान ठेवायचे की नाही. तुमच्या अंगावर जे आज ब्रँडेड कपडे दिसताहेत ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळेच!मुख्यमंत्र्यांवर टीका करता तेही एकेरी भाषेत. राजकारणाचा अन् विजयाचा इतका अहंकार तुम्हाला आला का? तुमच्या अंगावर जे आज ब्रँडेड कपडे दिसताहेत ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळेच! २०१९ला तुम्ही माणसात अन् राजकारणात आला नसतात ना राजकारणात तुम्हाला कोणी ओळखलेही नसते. मुख्यमंत्री तुमच्यामुळे असल्याचे तुम्ही सांगता. सगळे पक्ष मीच चालवतो, असेही तुम्ही म्हणता. इतकी तुमची पात्रता तरी आहे का? अशा शब्दात पडळकर यांनी टीका केली.
Web Summary : Gopichand Padalkar questioned Suhas Babar's eligibility to criticize the Chief Minister, stating Babar owes his political recognition to Devendra Fadnavis. Padalkar criticized Babar's arrogance and reminded him of his humble beginnings, suggesting his success is linked to Fadnavis's support.
Web Summary : गोपीचंद पड़लकर ने सुहास बाबर की मुख्यमंत्री की आलोचना करने की पात्रता पर सवाल उठाया, कहा कि बाबर अपनी राजनीतिक पहचान देवेंद्र फडणवीस के ऋणी हैं। पड़लकर ने बाबर के अहंकार की आलोचना की और उन्हें उनकी विनम्र शुरुआत की याद दिलाई, यह सुझाव देते हुए कि उनकी सफलता फडणवीस के समर्थन से जुड़ी है।