शेटफळेतील तरुणाची ‘गुगल’मध्ये निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST2021-02-05T07:26:09+5:302021-02-05T07:26:09+5:30

करगणी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील दीपक गायकवाड यांची जगातील आघाडीचे सर्च इंजिन असलेल्या असणाऱ्या गुगल कंपनीचे सॉफ्टवेअर इंजिनिअर ...

Google's selection of young people from Shetfal | शेटफळेतील तरुणाची ‘गुगल’मध्ये निवड

शेटफळेतील तरुणाची ‘गुगल’मध्ये निवड

करगणी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील दीपक गायकवाड यांची जगातील आघाडीचे सर्च इंजिन असलेल्या असणाऱ्या गुगल कंपनीचे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे. माणदेशाचा मानबिंदू म्हणून ओळख असलेल्या शेटफळे गावच्या नावलौकिकात भर घालणारी कामगिरी दीपक यांनी केली आहे.

ग्रामीण भागात शिक्षण घेत जगातल्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळविणे खूप कष्टप्रद गोष्ट आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या दीपक गायकवाड यांनी आतापर्यंत ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. दीपक यांचे प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण आटपाडीसारख्या दुष्काळी भागात झाले. इंजिनिअरिंगचे शिक्षण सांगली येथे झाले.

यानंतर आयआयटीसारख्या उच्च तंत्रज्ञान संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना गुगल कंपनीमध्ये नोकरी मिळविणे खूप अवघड असताना दीपक गायकवाड यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ही संधी मिळवली. ग्रामीण भागातील दीपक गायकवाड यांनी आपल्या गुणवत्तेच्या कौशल्यावर घेतलेली गगनभरारी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

Web Title: Google's selection of young people from Shetfal