माडग्याळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शेळ्यांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:56+5:302021-04-11T04:26:56+5:30

माडग्याळ : माडग्याळ (ता. जत) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शेळ्या बांधण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांत नाराजी व्यक्त ...

Goats live in Madgyal Gram Panchayat office | माडग्याळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शेळ्यांचे वास्तव्य

माडग्याळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शेळ्यांचे वास्तव्य

माडग्याळ : माडग्याळ (ता. जत) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शेळ्या बांधण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.

माडग्याळ ग्रामपंचायत कार्यालय मुख्य चौकात आहे. येथे ग्रामसेवक कधी येतात, कधी जातात हे कोणालाच माहीत होत ऩाही. ग्रामसेवकांचे दुर्लक्ष असल्याने येथील कर्मचारीही ग्रामपंचायतीकडे फारसे फिरकत नाहीत. त्यांच्या दुर्लक्षामुळे शेजाऱ्यांनी चक्क हे कार्यालय शेळ्या बांधण्यासाठी वापर करीत असून कार्यालयाचे दरवाजे सताड उघडे असल्याने शेळ्या आतमध्ये फिरून घाण करीत आहेत. हा सगळा प्रकार होत असताना कर्मचारी कुठे असतात, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. याबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत असून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ही इमारत जुनी असून मोडकळीस आली आहे. कार्यालय सुसज्ज बांधलेल्या व्यापारी संकुल येथे हलविण्याची मागणी काही नागरिकांतून होत आहे.

Web Title: Goats live in Madgyal Gram Panchayat office