शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी द्या : ‘शिक्षक भारती’ची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 6:48 PM

प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीसह निवडश्रेणी त्वरित मिळाली पाहिजे, अशी मागणी शिक्षक भारतीतर्फे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. तसेच दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांची अंशदान कपात केलेली रक्कम व्याजासह संबंधित शिक्षकांच्या खात्यात जमा करावी,

ठळक मुद्देअंशदान कपातीची रक्कम व्याजासह जमा करापरंतु, मिरज पंचायत समितीतून तो प्रश्न सोडविला जात नाही, तोही सोडविण्याचे डॉ. गाडेकर यांनी आश्वासन दिल्याचे पोळ यांनी सांगितले.

सांगली : प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीसह निवडश्रेणी त्वरित मिळाली पाहिजे, अशी मागणी शिक्षक भारतीतर्फे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. तसेच दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांची अंशदान कपात केलेली रक्कम व्याजासह संबंधित शिक्षकांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणीही संघटनेतर्फे केली आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे व कृष्णा पोळ यांनी दिली.

शरनाथे व पोळ म्हणाले की, दि. २३ आॅक्टोबर २०१७ नंतर बारा वर्षे व चोवीस वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी मंजूर करण्याबाबतची मागणी केली आहे. दि. २३ आॅक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयातील विद्या प्राधिकरणाने नवीन प्रशिक्षण आयोजित केले नसल्याने संबंधित शिक्षकांच्या पदोन्नती थांबल्या आहेत. प्रशिक्षण पूर्ण करून घेण्याचे हमीपत्र घेऊन पात्र शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी मंजूर कराव, ही मागणी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी, वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

शाळासिद्धीची वेबसाईट सुरू नसल्याने नवीन शाळांना पात्र असूनही माहिती भरता येत नाही. या प्रश्नावर अभिजित राऊत यांनी, शासनाकडूनच वेबसाईट बंद असून ती पुन्हा चालू करण्यात येणार आहे का, याबाबतची माहिती घेऊन तो प्रश्न सोडविण्यात येईल, असे सांगितले. दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांची अंशदान कपात, सहाव्या वेतन आयोगाचे तीन हप्ते या शिक्षकांच्या भविष्य निर्वाह खात्यावर व्याजासह जमा करावेत, अशीही मागणी करण्यात आली होती.

या मागण्यांबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी सकारात्मक आश्वासने दिली आहेत, असेही त्यांनी सांगितलेयावेळी शिक्षक भारतीचे चंद्रशेखर क्षीरसागर, दिगंबर सावंत, बजरंग वीरभद्रे, संजय कवठेकर यांच्यासह शिक्षक भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते.मिरज पंचायत समितीत : प्रश्न तसाचमिरज तालुक्यातील शिक्षकांच्या पगारातून २०१५-१६ मध्ये जादा कपात झालेल्या फंडाच्या रकमा या शिक्षकांना व्याजासह मिळाव्यात, या प्रश्नावर जिल्हा परिषद प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन ती रक्कमही मिरज पंचायत समितीकडे वर्ग केली. मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी त्यासाठी पाठपुरावाही केला आहे. परंतु, मिरज पंचायत समितीतून तो प्रश्न सोडविला जात नाही, तोही सोडविण्याचे डॉ. गाडेकर यांनी आश्वासन दिल्याचे पोळ यांनी सांगितले.

टॅग्स :Teacherशिक्षकSangliसांगली