जत पालिकेत होलार समाजाला संधी द्या : ऐवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:41+5:302021-06-20T04:18:41+5:30

गेली २३ वर्षे होलार समाज जगताप यांच्या पाठीशी कायम उभा राहिला आहे. जत तालुक्यात होलार समाज पंचवीस हजारांवर मतदार ...

Give opportunity to Holar community in Jat Municipality: Aivale | जत पालिकेत होलार समाजाला संधी द्या : ऐवळे

जत पालिकेत होलार समाजाला संधी द्या : ऐवळे

गेली २३ वर्षे होलार समाज जगताप यांच्या पाठीशी कायम उभा राहिला आहे. जत तालुक्यात होलार समाज पंचवीस हजारांवर मतदार संख्या आहे. तरीही जगताप यांना आजअखेर आम्ही काहीही मागितले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही जगताप यांच्या बैठकीत हीच मागणी केली होती. परंतु काही नेत्यांनी स्वीकृत नगरसेवक पदाचा विचार करू, असे सांगितले होते. त्याचा विचार व्हावा या होलार समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी ऐवळे यांनी केली आहे.

चौकट

कोणाला संधी

भाजपा पक्षाबरोबर रिपब्लिकन, रासप पक्ष युती आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी रिपब्लिकन पक्षाने दावा केला आहे. आता होलार समाजानेही मागणी केली आहे. आधीच भाजपाकडून तीन-चार उमेदवार इच्छुक आहेत. त्यात रिपब्लिकन पक्ष व होलार समाजाने हक्क सांगितला आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक कुणाला मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Give opportunity to Holar community in Jat Municipality: Aivale