Sangli: द्राक्ष बागायत शेतकऱ्यांची ५० लाखांची फसवणूक, तिघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 13:12 IST2025-03-01T13:11:57+5:302025-03-01T13:12:20+5:30

कवठेमहांकाळ : घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील सोळा द्राक्ष बागायत शेतकऱ्यांची सुमारे ४९ लाख ७९ हजार ६८ रुपयांची द्राक्षाच्या व्यापाऱ्यांनी ...

Fraud of 50 lakhs from farmers of grape orchards in Sangli district, fraud case against three | Sangli: द्राक्ष बागायत शेतकऱ्यांची ५० लाखांची फसवणूक, तिघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा 

Sangli: द्राक्ष बागायत शेतकऱ्यांची ५० लाखांची फसवणूक, तिघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा 

कवठेमहांकाळ : घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील सोळा द्राक्ष बागायत शेतकऱ्यांची सुमारे ४९ लाख ७९ हजार ६८ रुपयांची द्राक्षाच्या व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याची तक्रार कवठेमहांकाळ पोलिसात दाखल झाली.

फिर्याद संदीप बाळासाहेब शिंदे (वय ३६, धंदा शेती, रा. घाटनांद्रे) यांनी पोलिसात दिली. महादेव बाबासाहेब गडदे, (रा. नरसपूर, सेलू बोरकिनी, जि. परभणी), हरीशकुमार बिंदेवर शहा (रा. आझादपूर, उत्तर पश्चिम दिल्ली) आणि मोहित कुमार याच्यावर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. हा प्रकार १ ते २० फेब्रुवारीअखेर घडला.

घाटनांद्रे येथील बाळासाहेब बर्हिजी पाटील, हर्षल अरुण शिंदे, नैतारी भीमराव झांबरे, उत्तम वसंत शिंदे, पवन बबन शिंदे, स्वेजित पंडित शिंदे, विठ्ठल रामचंद्र शिंद, विजय रंगराव साळुंखे, रामचंद्र सदाशिव साळुंखे, संजय रावसाहेब शिंदे, मानसिंग वसंत झांबरे, प्रवीण जयसिंग शिंदे, प्रमोद जयसिंग शिंदे, शिवाजी तुकाराम जाधव, विष्णू एकनाथ जाधव (सर्व रा. घाटनांद्रे, ता. कवठेमहांकाळ) यासह एकूण ४९,७९,०६८ रुपयांची फसवणूक तिघांनी केल्याचे फिर्यादीत संदीप बाळासाहेब शिंदे यांनी म्हटले आहे. पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत.

धनादेश बाऊन्स झाल्याने फसवणूक

घाटमाथ्यावरील घाटनांद्रे हे गाव आहे. या गावात द्राक्ष शेती आहे. गावातील १६ द्राक्ष शेतकऱ्यांची द्राक्ष खरेदी केली. त्या शेतकऱ्यांना पैसे न देता धनादेश दिला. शेतकऱ्यांनी धनादेश बँक खात्यामध्ये पाठविला असता तो धनादेश बाऊन्स झाल्याने फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलिसात तिघांविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Fraud of 50 lakhs from farmers of grape orchards in Sangli district, fraud case against three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.