शिरगुप्पी : विजापूर - बेळगाव या महामार्गावरील सिद्धापूर (ता. जमखंडी) येथे मंगळवारी रात्री झालेल्या ट्रॅक्टर व कारच्या अपघातात चार युवकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ठार झालेले सर्वच युवक सिद्धापूर (ता. जमखंडी) गावचे रहिवासी असून ते यात्रेला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी रात्री सिद्धापूर (ता. जमखंडी ) येथील रहिवासी विश्वनाथ कंबर ( वय १७ ) प्रवीण शेडबाळ( वय २२) गणेश अरळीमट्टी (वय २०) व प्रज्वल शेडबाळ ( वय १७) हे सर्वजण चारचाकीने शिरोळ येथील काडसिद्धेश्वर यात्रेला निघाले होते. सिद्धापूर येथील प्रभू लिंगेश्वर साखर कारखान्याजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून त्यांच्या चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्याने या अपघातात सर्व चार युवक जागीच ठार झाले. या घटनेची नोंद जमखंडी ग्रामीण पोलिस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : Four youths from Siddapur died instantly in a tragic accident near Jamkhandi. Their car collided with a sugarcane tractor while en route to Kadasiddheshwar Yatra in Shirol. Police are investigating.
Web Summary : जमखंडी के पास एक दुखद हादसे में सिद्धापूर के चार युवकों की तत्काल मौत हो गई। शिरोल में काडसिद्धेश्वर यात्रा के रास्ते में उनकी कार एक गन्ना ट्रैक्टर से टकरा गई। पुलिस मामले की जांच कर रही है।