शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
5
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
6
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
7
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
8
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
9
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
10
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
11
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
12
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
13
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
14
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
15
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
16
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
17
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
18
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
19
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
20
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पंचायत समित्यांतील चार वर्षांचे प्रशासकराज अखेर संपुष्टात, जिल्हा परिषदेत बुधवारपर्यंत प्रशासकच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:45 IST

नवनिर्वाचित सदस्यांकडून लोकहिताच्या कामांची अपेक्षा

सांगली : पंचायत समित्यांतील प्रशासकराज तब्बल १ हजार ४५० दिवसांनी म्हणजे चार वर्षांनी संपुष्टात आले आहे. गेल्या दि. १० मार्च रोजी सभापती व उपसभापती निवडी झाल्यानंतर लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाल सुरू झाला आहे. यानिमित्ताने पंचायत समित्यांवर ऐतिहासिक म्हणता येईल इतका कालावधी प्रशासकराज राहिले आहे.

जिल्हा परिषदेतही येत्या बुधवारी (दि. १८) अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी होणार आहेत. त्यामुळे तब्बल १ हजार ४५८ दिवसांचे प्रशासकराज संपणार आहे. प्रशासकीय कालावधीत जिल्हा परिषदेत तीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासक म्हणून काम केले. गेल्या पंचवार्षिकमधील सदस्यांचा कार्यकाल २० मार्च २०२२ रोजी संपला होता. त्यानंतर सातत्याने निवडणुका लांबत गेल्या. २०२२ मध्ये कोरोनामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा वाद आणि न्यायालयातील तारखा यामुळे निवडणुका लांबत गेल्या. 

सरतेशेवटी दि. ७ फेब्रुवारीस मतदान आणि दि. ९ फेब्रुवारीस मतमोजणी झाली. आता अध्यक्षनिवडीनंतर प्रशासकराज संपुष्टात येणार आहे. सुमारे ४ वर्षे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे कामकाज प्रशासकांनी चालविले होते. या काळात नागरिक आणि प्रशासन यांच्यात एकप्रकारे दुराव्याची स्थिती होती. गावस्तरावरील विकासकामांसाठी जोर कोण लावणार? असा प्रश्न होता. प्रशासक काळात प्रशासनाचे बहुतांश कामकाज योजना राबविण्याचेच झाले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजनेसह बहुतांश शासकीय योजनांवरच प्रशासनाचा भर राहिला होता. 

रस्ते, गटारी, स्वीय निधीचा खर्च, वर्गखोल्या, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदी कामांसाठी थेट ग्रामपंचायतींनाच जिल्हा परिषदेत धडका माराव्या लागल्या. लोकहिताच्या प्रश्नांवर उठणारे आवाज गायब झाले. जलजीवन मिशनची बिले थकल्याने कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ आली. जिल्हा नियोजन समिती, आमदार व खासदार निधीसाठी पाठपुरावा थांबला. आता आमदार, खासदारांचेच समर्थक निवडून आल्याने निधी मोठ्या प्रमाणात मिळण्याची अपेक्षा आहे.

दालनांचे नूतनीकरण

पंचायत समितीत दि. १० मार्च रोजी प्रशासकराज संपले, तर जिल्हा परिषदेत येत्या बुधवारी (दि. १८) संपेल. नवे अध्यक्ष-उपाध्यक्ष व सभापतींच्या स्वागतासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. त्यांच्या दालनांचे नूतनीकरण केले जात आहे. गेल्या चार वर्षांत ही दालने रिकामीच पडू होती. त्यांचा वापर प्रशासकीय कामांसाठी केला जात होता. पदाधिकाऱ्यांची वाहनेदेखील अधिकाऱ्यांच्या तैनातीसाठी होती. ती आता पूर्ववत पदाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्याची तयारी सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Panchayat Samiti's Administrator Rule Ends; Zilla Parishad Awaits Election

Web Summary : Sangli Panchayat Samiti's four-year administrator rule ended with new elections. Zilla Parishad awaits chairman election, ending its administrative period. Development suffered during this phase, with focus shifting to government schemes.