चांदोलीतून चार हजार क्युसेक विसर्ग -पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच : पावसाची उघडीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 19:08 IST2019-08-14T19:05:34+5:302019-08-14T19:08:22+5:30
प्रशासनामार्फत पूर ओसरल्यावर साथीचे रोग पसरू नयेत यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. पिके पाण्याखाली राहिली असल्याने तसेच शेतीचे बांध वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

चांदोलीतून चार हजार क्युसेक विसर्ग -पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच : पावसाची उघडीप
शिराळा : शिराळा तालुक्यात पावसाने पूर्ण उघडीप दिली असून, चांदोली धरणाचे दरवाजे बुधवारी पुन्हा उघडून ३३७१ क्युसेक व वीजनिर्मिती केंद्रातून ६१८ क्युसेक असे एकूण ३९८९ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात शासकीय, नागरिक, सामाजिक संस्था यांच्याद्वारे मदतीचा ओघ सुरूच आहे.
प्रशासनामार्फत पूर ओसरल्यावर साथीचे रोग पसरू नयेत यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. पिके पाण्याखाली राहिली असल्याने तसेच शेतीचे बांध वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. जवळपास वीस हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच ५६९ अंशत: तसेच १० संपूर्ण घरे पडली आहेत. या घरांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तसेच पिकांचे पंचनामे नदीचे पाणी पूर्णपणे कमी झाल्यावर करण्यात येणार आहेत. अतिवृष्टीने तसेच पाणी मोठ्या वेगात वाहिल्यामुळे शेताचे बांध व पिके वाहून गेल्यानेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे याही नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
नऊ दिवस तालुक्यात अतिवृष्टी सुरू होती. त्यामुळे वारणा व मोरणा नद्या दुथडी भरून वाहत होत्या. तालुक्यात वारणा नदीकाठावरील गावांमध्ये महापुराचे संकट आले होते. यामुळे २१ गावांतील ६०५ कुटुंबांतील २९३७ नागरिक व २७२६ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. आता हे नागरिक स्वगृही परतू लागले आहेत.
चांदोली धरण ९४.७५ टक्के भरले
- धरण पातळीत - ६२५.४५
- एकूण पाणीसाठा - ९२३.६०४-
- उपयुक्त पाणीसाठा - ७२८.१६४-
- टी.एम.सी. : ३२.६०-
- टक्केवारी : ९४.७५ टक्के-
- धरणात पाण्याची आवक : ४७६६ क्युसेक-
- धरणातून विसर्ग : ३९८९ क्युसेक