खुनीहल्लाप्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:27 IST2021-09-03T04:27:51+5:302021-09-03T04:27:51+5:30

सांगली : शहरातील कॉलेज कॉर्नर येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूहल्ला केल्याप्रकरणी चौघांवर कारवाई करण्यात आली. एका अल्पवयीनाची बालसुधारगृहामध्ये रवानगी करण्यात ...

Four arrested in murder case | खुनीहल्लाप्रकरणी चौघांना अटक

खुनीहल्लाप्रकरणी चौघांना अटक

सांगली : शहरातील कॉलेज कॉर्नर येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूहल्ला केल्याप्रकरणी चौघांवर कारवाई करण्यात आली. एका अल्पवयीनाची बालसुधारगृहामध्ये रवानगी करण्यात आली तर अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यात साद पखाली, मोहम्मदअसिफ मोहम्मदफजल चौधरी (दोघेही रा. अभयनगर) आणि आकाश चंदनशिवे (रा. राजीवनगर, सांगली) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार, दि. १ रोजी शहरातील कॉलेज कॉर्नर येथे शिवराज राजशेखर बन्ने (२०, रा. माधवनगर) याच्यावर संशयितांनी चाकूने वार करत त्यास जखमी केले होते. जखमी शिवराज व संशयितांमध्ये महिनाभरापूर्वी वाद झाला होता. बुधवारी शिवराज महाविद्यालयात प्रमाणपत्र घेण्यासाठी आला असताना, दोघे एकमेकांसमोर आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली त्यातून हल्ला करण्यात आला. यात एका अल्पवयीनाचा समावेश असल्याने त्यास रिमांड होममध्ये दाखल करण्यात आले, तर इतर तिघांना अटक करण्यात आली. या हल्ल्यात सहभागी असलेल्या अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.

Web Title: Four arrested in murder case