शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार विलासराव शिंदे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 2:06 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विलासराव भाऊसाहेब शिंदे (वय ८१) यांचे आष्टा (ता. वाळवा) येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. आष्टा शहर आणि परिसरातील सर्व गावांमध्ये बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार विलासराव शिंदे यांचे निधनआष्टा शहर आणि परिसरातील सर्व गावांमध्ये बंद ठेवून श्रद्धांजली

आष्टा : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विलासराव भाऊसाहेब शिंदे (वय ८१) यांचे आष्टा (ता. वाळवा) येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. आष्टा शहर आणि परिसरातील सर्व गावांमध्ये बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.गेल्या वर्षभरापासून शिंदे यांना मूत्रपिंडाचा विकार सुरू झाला होता. त्यातच त्यांना धापही लागत होती. त्यांच्या हृदयावर विदेशात शस्त्रक्रिया झाली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच विश्रांती घेत होते. गुरुवार, दि. १३ रोजी कोल्हापूर येथे डायलेसिस करण्यात आले होते.सोमवारी सकाळी साडेपाचला त्यांना उलट्यांचा त्रास झाला म्हणून येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच सहाच्यादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी रत्नप्रभा शिंदे व माजी नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे, मुले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सदस्य, भाजपचे जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे व माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे, मुलगी वैशाली अजय जाचक (बारामती), बंधू माजी नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे यांच्यासह तीन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.दोनच दिवसांपूर्वी येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत त्यांनी शिल्पकार आणि नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. तो त्यांचा अखेरचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला.विलासराव शिंदे यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९३८चा. त्यांचे वडील भाऊसाहेब आष्ट्याचे पहिले नगराध्यक्ष होत. वडिलांकडून राजकीय वारसा मिळालेल्या शिंदे यांची राजकीय कारकीर्द १९६२ मध्ये सुरू झाली. प्रथमत: ते सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. १९६७-७८ दरम्यान त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद आणि शिक्षण व अर्थ समितीचे सभापतीपद सांभाळले. या काळात त्यांनी जिल्ह्यात इंग्रजी शिक्षणाबाबत शिंदे प्रगती योजना राबवली. पुढे ती राज्यभर राबवण्यात आली.१९७८ मध्ये ते काँग्रेसकडून तत्कालीन वाळवा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठिंब्यावर राजारामबापू पाटील आणि एन. डी. पाटील या दिग्गजांचा पराभव केला होता. ही निवडणूक लक्षवेधी ठरली होती.१९९६ मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते संचालक झाले. त्यानंतर त्यांनी बँकेचे अध्यक्षपद दीर्घकाळ भूषवले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आजअखेर त्यांनी जिल्हाध्यक्षपद सांभाळले. यादरम्यान सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातून ते विधानपरिषदेवर निवडून गेले.शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य महामंडळ अध्यक्ष, दुय्यम सेवा मंडळ पुणे सदस्य, महाराष्ट्र राज्य युवक कल्याण समिती सदस्य या पदांची जबाबदारी सांभाळली असून, राजाराम शिक्षण संस्था, जिल्हा ग्रंथालय संघटना, जिल्हा स्काऊट गाईड संस्था, खुजगाव धरण कृती समिती या संस्था-संघटनांचे अध्यक्षपद भूषविले होते.शांत, संयमी पण कडक शिस्तीचे कुशल संघटक अशी ओळख असणाऱ्या विलासराव शिंदे यांचे निधन झाल्याची बातमी वाºयासारखी पसरली. त्यानंतर जिल्हाभरातील कार्यकर्ते आणि नागरिकांची आष्टा-सांगली रस्त्यावरील शिंदे यांच्या निवासस्थानी रीघ लागली.अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकजण शिंदे यांच्या आठवणीने गहिवरले होते. त्यांचे पार्थिव सकाळी सहा ते अकरा या वेळेत घरात ठेवल्यानंतर काही काळ शिंदे मळ्यात नेण्यात आले. त्यानंतर येथील विलासराव शिंदे माध्यमिक विद्यालयात नागरिकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. दुपारी एकनंतर शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. सायंकाळी पाचच्या दरम्यान शिंदे विद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.आष्टा शहराचा चेहरामोहरा बदलण्यात योगदानआष्टा नगरपालिका सुरुवातीपासून शिंदे गटाच्या ताब्यात आहे. आष्ट्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजना राबवण्यात शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता. शहरात सुमारे अडीच हजार घरकुले उभारण्यात आली आहेत. नवीन पाणीपुरवठा योजना, विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल, भाजी मंडई, फिश मार्केट यासह विविध विकासकामांद्वारे त्यांनी शहराचा चेहरामोहरा बदलला.

विलासराव शिंदे यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आजतागायत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पेलली होती. अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. ते सर्वोत्तम संघटकही होते. आम्ही २५ वर्षे एकत्र काम केले. त्यांच्या अकाली जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात सहभागी आहे.- आ. जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

टॅग्स :Vilasrao Shindeविलासराव शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSangliसांगली